शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांवरील निर्बंध अखेर मागे

By admin | Updated: March 18, 2017 05:51 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जुन्या नोटा स्वीकारण्यावर घातलेले निर्बंध काढून टाकण्यात येणार असल्याने या बँकांमधील नोटा संबंधित बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये भरण्याचा

पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जुन्या नोटा स्वीकारण्यावर घातलेले निर्बंध काढून टाकण्यात येणार असल्याने या बँकांमधील नोटा संबंधित बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा बँकेकडे रद्द केलेल्या सुमारे ५७४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यातील बैठकीत हा निर्णय झाला असून, येत्या मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घातले. त्यानुसार रद्द केलेल्या नोटा बँकांद्वारे करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्यास बंदी घातली. तेव्हापासून जुन्या नोटा या बँकांत पडून असून, त्याचा फटका ग्राहक व शेतकऱ्यांना बसला होता. सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला या बँकांमधील खात्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘आरबीआय’ने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला (नाबार्ड) तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ‘नाबार्ड’कडून त्याबाबतचे प्रमाणपत्र मिळत पुढील कार्यवाही थांबली होती. शरद पवार यांनी जिल्हा बँकांचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज आणि अन्य अर्थसहाय्य मिळणे कठीण झाल्याचे जेटलींच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा बँकांवरील निर्बंध उठवून त्यांच्याकडील बाद नोटा करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्याचे ठरले, असे पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार भोसले म्हणाले. नाबार्डने जिल्हा बँकेतील खातेदारांचे केवायसी तपासले. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांची माहिती घेतली. पण प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे या विषयावर पवार यांनी जेटली यांची भेट घेतली, असे भोसले यांनी सांगितले. कोणत्या बँकेत भरणा?पीडीसीसीच्या करन्सी चेस्ट म्हणून आयडीबीआय, बँक आॅफ इंडिया आणि सेंट्रल बँक आॅफ इंडिया या बँका असून, त्यामध्ये नव्याने आयसीआयसीआय या बँकेचा समावेश झाला आहे. संबंधित नोटा या बँकांमध्ये भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पेटारे खरेदी करण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले. ठेवींमध्ये वाढदेशातून भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादाला मिळणारा पैसा थांबविण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयामुळे बँकांमधील ठेवींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातून व्याजदर कमी होण्यास मदत होईल. आपल्या कर्जाचा आधार अधिक व्यापक करण्यास त्यामुळे बँकांना मदत होईल. नोटाबंदी लागू झाल्यानंतर बँकांमधून पैसे काढण्यावर अनेक बंधने लादण्यात आली होती. ते निर्बंध दूर केल्याचे जेटली म्हणाले.

(प्रतिनिधी)