शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषेत बांधकामांवर निर्बंध घालणार का?

By admin | Updated: April 22, 2016 03:43 IST

गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांच्या पूररेषेमध्ये (लाल रेषा) बांधकामांना परवानगी न देण्याची शिफारस नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने (निरी) नाशिक महापालिकेला केली आहे

मुंबई : गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांच्या पूररेषेमध्ये (लाल रेषा) बांधकामांना परवानगी न देण्याची शिफारस नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने (निरी) नाशिक महापालिकेला केली आहे. मात्र प्रस्तावित विकास आराखड्यात नदीच्या लाल रेषेवरही बांधकाम करण्याची मुभा असल्याने नाशिक महापालिकेने निरीची शिफारस मान्य करण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांना नाशिक महापालिका व निरीची बाजू ऐकून घेत पूररेषेमध्ये बांधकाम करण्यास निर्बंध घालणे शक्य आहे का? याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहेत.गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका व नदीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांना योग्य आदेश द्यावेत, यासाठी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. गोदावरी नदीच्या प्रदूषणाला आळा बसावा यासाठी उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी निरीला गोदावरीची पाहणी करून महापालिकेला सूचना व शिफारशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेक शिफारशी व सूचना निरीने नाशिक महापालिकेला केल्या. त्यापैकी एक सूचना गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या पूररेषेमध्ये (लाल रेषा) बांधकाम करण्यास मनाई करावी, अशी होती. मात्र या शिफारशीबाबत महापालिकेमध्ये १२५ तक्रारी नोंदवण्यात आल्या. तसेच निरीच्या शिफारशी विचारात घेण्याबाबाबत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही अप्रत्यक्षपणे निरीची ही शिफारस मान्य करण्यास नकार दिला. तर नाशिक महापालिकेला आतापर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी किती जमीन संपादित करण्यात आली व आतापर्यंत या प्रकल्पांची काय प्रगती आहे, यासंदर्भात तपशीलवार माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)