शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला मतदान करणारे १८ नगरसेवक राष्ट्रवादीतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 05:57 IST

शहराध्यक्ष विधाते यांनाही पक्षाने हटविले

मुंबई : अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षाचे शहर अध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरुन हटविण्यात आले, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली.

या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये, असा स्पष्ट आदेश असताना तो डावलण्यात आला.त्यानंतर पक्षाच्या वतीने त्यांना सात दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिसीद्वारे दिली होती. परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात आली. विधाते यांनी पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कल्पना दिली नाही किंवा या घटनेबाबत खुलासा केला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या निर्णयामुळे अहमदनगर शहरात राष्ट्रवादी पक्ष रिकामा झाल्याचे चित्र आहे. जो बाणेदारपणा आम्ही दाखवला तोच भाजपा स्वत:च्या नगरसेवक किंवा पंचायत समिती सदस्यांबद्दल दाखवणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.निवडणूकपूर्व ‘फॉर्म्युला’नगरच्या भाजपा-राष्ट्रवादी या युतीची राज्यभर चर्चा झाली. शरद पवार यांच्याच विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने नगरसेवकांची हकालपट्टी करत राष्ट्रवादीने आपली मान सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांना पक्षात ठेवले. हा ‘फॉर्म्युला’ म्हणजे ‘लोकसभापूर्व’ तात्पुरती मलमपट्टी मानली जाते.