शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

वारकऱ्यांसाठी विसावा

By admin | Updated: June 9, 2016 02:09 IST

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे

पिंपरी : महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या देहू- आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांसाठी विसावा तयार केला आहे. त्यास तुळशी वृंदावन असे नाव देण्यात आले आहे. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाचा आषाढी वारीचा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनू लागला आहे. विश्वकल्याणाचे दान मागणाऱ्या या सोहळ्याची लौकिकता वाढतच आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज या संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. तर दर महिन्याला वारीसाठी देहू-आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असतात. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. वारकरी देहूतील संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन घरी परतत असतात. अशा वारकऱ्यांना विसाव्यासाठी आजवर कोणतीही सोय नव्हती. म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने सीएसआरमधून बीआरटी मार्गावर तुळशी वृदांवन विसावा निर्माण करण्याचे ठरले. ही संकल्पना तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची होती. (प्रतिनिधी)... असा आहे विसावाविसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आसन व्यवस्था किमान पंचवीस लोक एकाच वेळी बसू शकतात. या ठिकाणी वारकऱ्यांना भजन करण्यासाठी जागा तयार केली आहे. छोटी छोटी झाडे, तसेच हिरवळीने वृंदावनाचा परिसर सुशोभित केला आहे. चार बाय ग्रेनाइटवर संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांची वचने आणि छायाचित्रे असणार आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो...’ अशी संतवचने या ठिकाणी लावण्यात आली आहेत. या ठिकाणी विजेची बचत व्हावी म्हणून एलईडी दिवे बसविलेले आहेत. पाच ठिकाणी उभारणार वृंदावनदेहू-आळंदी रस्त्यावर पाच ठिकाणी तुळशी वृदांवन विसावे उभारले जाणार आहेत. डुडुळगाव येथे राजमाता जिजाऊ फार्मसी महाविद्यालयासमोर, मोशी चौक, हवालदारवस्ती मोशी, राजकमल विहार सोसायटी, बोराटेवस्ती असे विसावे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी बोराटेवस्ती येथील विसाव्याचे काम पूर्ण झाले आहे.देहू-आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांना विसाव्यासाठी सोय नव्हती. आषाढी वारी किंवा महिन्याची वारी करण्यासाठी वारकरी या रस्त्याने जात असतात. काही छोट्या दिंड्याही या मार्गावरून जात असतात. वारकऱ्यांना विसाव्याची सोय नव्हती. या मार्गावर विसावा निर्माण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी महापालिकेचा कोणताही निधी खर्च केला जाणार नाही. यासाठी गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास ठिकठिकाणी विसावे उभारता येणार आहेत.-विजय भोजणे अभियंता, बीआरटीएस