शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'उर्वरित महाराष्ट्रालाही मुंबईप्रमाणे वीज मिळाली पाहिजे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:47 IST

आपल्याकडे अतिरिक्त वीज असली तरीसुद्धा शेवटच्या माणसाला ती वीज मिळत नाही.

आपल्याकडे अतिरिक्त वीज असली तरीसुद्धा शेवटच्या माणसाला ती वीज मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वीज प्रणाली अशक्त आहे. त्यामुळे एकीकडेच अतिरिक्त वीज आहे. अतिरिक्त वीज असल्यामुळे त्याचे फिक्स चार्जेस म्हणजे स्थिर आकार आहेत. हे स्थिर आकार भरले जात आहेत. तरीसुद्धा तेथील माणसाला वीज मिळत नाही. परिणामी महाराष्ट्र भारनियमनमुक्त आहे, असे म्हटले जाते. मात्र वीज उपलब्ध होत नाही. माझ्या घरात का वीज नाही? हा प्रश्न सुटत नाही. एका अर्थाने वीज प्रणाली सुधारत नाही तोवर हे प्रश्न येतच राहणार. भविष्यात माणसाला २४ तास मुंबईसारखी वीज मिळाली पाहिजे. मुंबईला वीज नाही हा प्रकार मुंबईत नाहीच. उर्वरित महाराष्ट्राने मुंबईच्या दिशेने प्रवास केला पाहिजे.आपल्या आजूबाजूच्या राज्यात कारखान्यांना दिली जाणारी वीज ही स्वस्त आहे. ही वीज जवळजवळ २० ते २५ टक्क्यांनी स्वस्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वीज खरेदीची किंमत अधिक आहे. वीज वितरणाची किंमत अधिक आहे. आपली वीज खरेदीची किंमत ४ रुपये, वितरणाची किंमत २ रुपये; अशी ६ रुपये आहे. बाकीच्यांची ही किंमत साडेचार रुपये आहे. कारण त्यांच्याकडे वीज विकत घेण्याची किंमत साडेतीनपर्यंत आहे. दोन रुपयांची वीज दीड रुपयाच्या आसपास आहे. त्यामुळे त्यांची सरासरी वीज किंमत कमी आहे. वीज किंमत कमी असल्याने साहजिकच बाकीचे दर, किमती खाली येतात. या दिशेने आपण प्रवास केला पाहिजे.दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी राहिली आहे. यास कारण ग्राहक नाहीत तर येथे असलेले राजकारण आहे. एकापाठोपाठ सवलत दिली जाते. मात्र यामुळे होणारा जो तोटा किंवा नुकसान, फरक हा सरकारने भरून काढला पाहिजे. कृषीपंपाचे जे मोजमाप आहे याबाबत खूप वाद आहेत. त्यातून मुक्तता झाली पाहिजे. भविष्यात सुधारणा घडल्या पाहिजेत; त्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. उद्योगधद्यांना जास्त दराने वीज मिळते. त्यांना स्पर्धेत टिकाव धरता येत नाही. एमआयडीसीमध्ये त्यांना त्रास सोसावा लागतो. हे आॅनलाइन केले पाहिजे. उद्योगांची वाढ व्हायची असेल तर गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. कारण छोट्या उद्योगधंद्यांना याचा मोठा त्रास होतो. स्थानिक राजकारणाचाही फटका बसतो. तो बसता कामा नये. सरकारने उद्योगांच्या पाठी उभे राहिले पाहिजे.अशोक पेंडसे (लेखक वीज क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :electricityवीज