शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मदत देण्याऐवजी झटकली जबाबदारी

By admin | Updated: June 30, 2016 01:34 IST

सोमवारी रात्री पौड रस्त्यावरून जाणाऱ्या गीतांजली पालांडे या अपंग तरुणीच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून पळवून नेला.

कोथरूड : सोमवारी रात्री पौड रस्त्यावरून जाणाऱ्या गीतांजली पालांडे या अपंग तरुणीच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून पळवून नेला. त्यांनी चोर...चोर.. असे ओरडून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्य$ंत चोरटा पळून गेला होता. अपंग असल्याने त्या चोराचा पाटलागही करू शकत नव्हत्या. त्यामुळे मदतीसाठी त्यांनी १०० नंबरला फोन केला; पण मदत मिळण्याऐवजी उपदेशाचा डोस पाजला.१०० नंबरवरून पोलीस मुख्यालयात जाणारा हा कॉल रेकॉर्ड होत असल्याने तेथून योग्य सल्ला व मदत मिळणे अपेक्षित होते; परंतु फोन घेतलेल्या कर्मचाऱ्याने घटनास्थळी मार्शल पाठविण्याची व्यवस्था करण्याऐवजी, तुम्ही किश्किंदानगर पोलीस चौकीला जाऊन तक्रार करा, असा सल्ला पालांडे यांना दिल्याने त्यांना धक्काच बसला. घडलेला प्रकार त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते श्रीपाद चिकणे यांना फोनवरून सांगितला. चिकणे यांनी किष्किंदानगर पोलिसांना हा प्रकार कळवताच ती हद्द एरंडवणा पोलीस चौकीची असल्याचे त्यांना सांगण्यात आले. रात्री चौकीवर जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी आपण पोलीस चौकीवर जाऊ, असा सल्ला चिकणे यांनी पालांडेंना दिला. मंगळवारी सकाळी त्या किष्किंदानगर पोलीस चौकीला गेल्या असता चौकी बंद असल्याचे आढळले. त्यामुळे चिकणे यांनी त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी नेले. तेथील पोलिसांनी त्यांना परत किष्किंदानगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी पाठविले. पालांडे या अपंग तरुणीला आलेला अनुभव धक्कादायक आहे. असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची पोलिसांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोथरूड पोलिसांना याबाबत विचारले असता, पालांडे यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. गुन्ह्याचा तपास चालू असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)>धीर देण्याऐवजी...पालांडे म्हणाल्या की, मी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. कामावर जात असताना भररस्त्यावर हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला. त्यावरून चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याचा अंदाज येतो. मोबाईलचा वा त्यातील सीमचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने तक्रार नोंदवावी, असे मला वाटले. या प्रकारात धीराचे व समजुतीचे दोन शब्द कानावर पडण्याऐवजी वेगवेगळ्या पोलीस चौक्यात जाण्याचा सल्ला मिळाल्याने धक्का बसला. चिकणे म्हणाले की, पोलीस कंट्रोल रूमचा नंबर बऱ्याचदा व्यस्त लागतो. तक्रार आल्यावर ती व्यवस्थित ऐकणे, संबंधिताला योग्य मार्गदर्शन होणे व परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे.