शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद

By admin | Updated: October 20, 2014 05:04 IST

मोदी लाटेपेक्षा एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रथमच खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा, या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. प्रथमच दोन आकडी संख्या भाजपाने गाठली.

मिलिंद कुळकर्णीमोदी लाटेपेक्षा एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रथमच खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा, या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. प्रथमच दोन आकडी संख्या भाजपाने गाठली. ३४ वर्षे म्हणजे सलग नऊ वेळा आमदार राहिलेल्या सुरेशदादा जैन (शिवसेना) यांचा पराभव धक्कादायक ठरला. जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८ आमदारांना मतदारांनी घरी पाठवले. युती तुटण्याला कारणीभूत ठरल्याची चर्चा असलेली भुसावळची जागा भाजपाने सेनेकडून खेचून घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरात सभा घेऊनही खडसे निवडून आले, पण मताधिक्य ९,७०८ वर आले. राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. केवळ एक उमेदवार निवडून आला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गावित बंधूंची सद्दी मतदारांनी संपवली. स्वत: डॉ.विजयकुमार गावित निवडून आले तरी शरद व राजेंद्र हे बंधू आणि जगदीश हे शालक पराभूत झाले. आदिवासी बांधवांनी पुन्हा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. इगतपुरीसह तब्बल ६ आदिवासी जागा काँग्रेसने जिंकल्या. शिवसेनेची स्थिती जैसे थे राहिली. धुळ्यातली जागा गमावली, तरी जळगावात ती कमावली. मनसेला हद्दपार करतानाच, माकपाचे पुनरुज्जीवन करून, भाजपाला थोडे झुकते माप देऊन आणि उभय काँग्रेसच्या पदरात त्यांचे माप टाकून नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी मोठा विलक्षण समन्वय साधला आहे. राज ठाकरे यांनी ज्या शहराला आपली राजकीय प्रयोगशाळा मानले, त्या नाशिक शहराने त्यांच्या पक्षाकडील तिन्ही आमदारक्या खेचून घेतल्या व त्या अलगदपणे भाजपाच्या ओंजळीत टाकल्या.