शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विष्णू वाघ यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 22:16 IST

उपसभापती व साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती पुन्हा ठिक होऊ शकते, अशी आशा काल शनिवारी जागी झाली व गोव्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २० : उपसभापती व साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती पुन्हा ठिक होऊ शकते, अशी आशा काल शनिवारी जागी झाली व गोव्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ यांना गेल्या 15 रोजी दुस:यांदा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना 18 रोजी अत्यवस्थ स्थितीत बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळातून मुंबई येथील हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले होते. हिंदुजामध्ये देशातील अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक वाघांवर उपचार करत आहे.

वाघ यांनी उपचारांना प्रतिसाद देणो सुरू केले आहे,असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर यांनी दिली. खेडेकर हे हिंदुजा इस्पितळात होते, ते शनिवारी गोव्यात परतले. वाघ अतिदक्षता विभागात असून वाघ यांच्या डोळ्य़ांनी हालचाल केल्याचे आयसीयूमधील डॉक्टरांनी पाहिल्याचे खेडेकर यांचे म्हणणो आहे. वाघ यांच्या आरोग्याबाबत एक चाचणी शनिवारी सायंकाळी डॉक्टरांकडून करण्यात आली. ती सकारात्मक असून त्यामुळे वाघ पुन्हा ठिक होण्याची आशा निर्माण झाली आहे, असे खेडेकर म्हणाले. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ ह्या हिंदुजा इस्पितळात असून वाघ यांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे व आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अरुणा यांनीही जाहीर केले आहे. कुणीच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.