शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सारस्वताच्या दरबारातील एक मानाचे पान विजया राजाध्यक्ष

By admin | Updated: March 8, 2017 19:25 IST

यंदाच्या जनस्थान पुरस्काराच्या मानकरी. या निमित्ताने त्यांची साहित्य क्षेत्रातील उंची नव्याने अधोरेखित झाली. विजया राजाध्यक्ष हे मराठी सारस्वताच्या दरबारातील

यंदाच्या जनस्थान पुरस्काराच्या मानकरी. या निमित्ताने त्यांची साहित्य क्षेत्रातील उंची नव्याने अधोरेखित झाली. विजया राजाध्यक्ष हे मराठी सारस्वताच्या दरबारातील एक मानाचे पान. मराठी स्त्री लेखनात, कथा लेखनात जो धैर्याचा बाज आहे, तो विजयाबाईंच्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांमधून सातत्याने जाणवतो. भाषा- विचार आणि भाषा-व्यवहार या बाबतीत संवेदनशील असलेल्या विजयाबाई मराठी भाषा जगण्याविषयी कमालीच्या सजग आणि आग्रही आहेत. मराठीकडे मातृभाषा म्हणून पाहतानाचा त्यांचा दृष्टिकोन मराठी जगविण्यास उपयुक्त आहे. शाळा हा जीवनाचा पाया आहे. त्या पायापाशीच मराठी शिक्षणाचा नीट संस्कार व्हायला हवा, हे त्यांचे केवळ मत नव्हे, तर ती त्यांची धारणा आहे. चौफेर आणि विपुल लेखन केले असले, तरी विजयाबाईंचा वैचारिक गाभा हा समीक्षकाच्या जातकुळीतला आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. साहित्याविषयी ओढ असलेल्या विजयाबाईंना त्याला पोषक असा शिक्षकी पेशाच निवडला. उभी हयात त्यांनी अध्यापन केले. एसएनडीटी आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले.विजयाबाईंच्या साहित्याचा आकृतिबंध कथेचा असला, तरी त्याचा सोलीव गाभा कथेकरी नव्हे, तर वैचारिक राहिला. हे त्यांचे वैशिष्ट्य कायम राहिले. त्यांच्या समीक्षा लेखनातील धैर्याचा भाग त्याचेच प्रत्यंतर देतो. त्यांची समीक्षा शोधक वृत्तीची राहिली. त्यामुळेच कथांमधील स्त्री चित्रण वरपांगी मध्यमवर्गीय वाटलं तरी त्यातून वेगळा विचार सतत डोकावत राहिला. विचारवंतांच्या नसण्याची पोकळी विजयाबाईंच्या सऱ्हदय वैचारिक लेखणीने कायमच भरून काढली. जवळपास वीस-एक कथासंग्रहांमधून मराठी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या विजयाबाई २००० साली इंदूरला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या.