शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मताचा आदर करा

By admin | Updated: February 19, 2017 02:59 IST

एखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला

- विजय कुंभारएखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला जाईल यात शंकाच नाही. तसेच काहीसे घडले आहे आपल्या देशाबद्दल. आपल्या देशातील नागरिकांनी लोकशाही स्वीकारली तेव्हाच देशातील प्रत्येक माणूस त्याचा मालक झाला. लोकशाही म्हणजे ‘लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालविलेले राज्य!’ हे जवळपास देशातील प्रत्येकाला तोंडपाठ असेल. परंतु लोक म्हणजे आपण आणि आपण या देशाचे राजे आहोत असे खरेच किती जणांना वाटते? कदाचित शतकानुशतके राजेशाही किंवा हुकूमशाहीची सवय लागली असल्याने असा ‘देशाचा मालकी हक्क’ अनेकांच्या पचनी पडला नसावा. त्याचमुळे ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी प्रत्येक निवडणुकीत सेवकांकडेच आपला मालकीहक्क सोपवून मोकळे होत असावेत. हा देश चालविण्यासाठी संसद, विधान मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. सोयीसाठी आपण त्यांना कंपन्या म्हणू. या कंपन्यांसाठी सेवक निवडीची जी प्रक्रिया राबवली जाते तिला ‘निवडणूक’ म्हणतात. निवडणुकीमध्ये आपल्या वतीने हा देश चालविण्यासाठी आपले ‘सेवकङ्क्तप्रतिनिधी’ निवडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायचे असते. परंतु बऱ्याचदा ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी मतदान करीत नाहीत किंवा कोणत्यातरी संभाव्य सेवकाला आपले मत विकून मोकळे होतात. परिणामी, निवड झाल्यानंतर सेवक मुजोर होतात, मनमानी करतात आणि मालकांचे ऐकेनासे होतात.प्रत्येक निवडणुकीत बहुतांश मालकांनी म्हणजे मतदारांनी आपल्या निष्क्रियतेने किंवा भ्रष्टाचाराने सेवकांना जाब विचारण्याचा हक्क गमावलेला असतो. प्रत्येक मतदाराने नेहमी स्वत:ला आपल्या मताची किंमत समजली आहे का आणि स्वत:तरी आपल्या मताचा आदर करतो का हे पाहिले पाहिजे. मताचा आदर करणे म्हणजे मतदान करणे. परंतु मतदानाच्या दिवशी ते न करता सुटी एन्जॉय करणारे, मत विकणारे आपल्या मताचा अनादर करीत असतात. जे लोक स्वत:च्या मताचा आदर करीत नाहीत त्यांच्या मताचा आदर ‘इतरांनी’ तरी का करावा? त्यामुळेच ‘सेवक’ एकदा निवडून आले की जनतेच्या मताला किंमत देत नाहीत आणि मतदारांचे मालक होतात. आपल्या मताचा आदर करून स्वच्छ मनाने आणि निर्भीडपणे मतदान केले तर आपण निवडून दिलेल्या सेवकाला मालक या नात्याने जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला राहील. लाचार होऊन लोभापोटी मतदान केले तर आपण गुलामगिरी स्वीकारून स्वत:साठी मालक निवडतोय असा त्याचा अर्थ होईल आणि गुलामांना कोणतेही हक्क नसतात. मतदान न करणारे किंवा मत विकणारी मंडळी आपल्या कृत्याने भ्रष्ट व नालायक सेवकाची निवड होण्यास मदत करीत असतात आणि स्वत:वरच नव्हे, तर प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्यांवरही जबरदस्तीने गुलामगिरी लादत असतात. म्हणूनच गुलामगिरी नको असेल तर मतदान केले पाहिजे.

(लेखक हे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.)