शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

महाराष्ट्राभिमान वाढविणाऱ्यांचा सन्मान ! तुमचं एक मत, बनू द्या लोकमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 11:58 IST

या भूमीशी ज्यांनी रक्ताचे-घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले,त्या महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमत'महाराष्ट्रीयन आॅफ द इयर'चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया सुरू

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमत'महाराष्ट्रीयन आॅफ द इयर' चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ' विजेत्यांची निवड साकारत आहे. पुरस्काराच्या यंदाच्या पर्वात १४ कॅटेगरीतील नामांकनांमधून विजेत्यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११ नामांकित ज्युरींचे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. एकापरीने तेजाने तेजाची आरती होण्याचा ऐतिहासिक क्षण आता नजरेच्या टप्प्यात आला आहे. विजेत्यांची निवड करण्यासाठी ( तुमचं मत इथे नोंदवा-   lmoty.lokmat.com) या हक्काच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील वाचकांनो आजपासून तुम्हाला तुमचे मत नोंदविता येणार आहे.

महाराष्ट्राचा अभिमान वाढविणाऱ्यांचा सन्मान करणे, हा या मातीतील प्रत्येकाचा पर्यायाने लोकमताचा अधिकार आहे. म्हणूनच कृतज्ञतेची पोचपावती देण्यासाठी अशी माणसे...महाराष्ट्राचे व्यक्तिस्वरूप मानबिंदू हेरण्यासाठी 'लोकमत'च्या संपादकीय चमूने गेले काही महिने मंथन केले. कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वांचा शोध घेतला. त्यातून साकारलेली नामांकने आणि वाचकांच्या मताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळामध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे.

देशातील पायाभूत सुविधांचा आधुनिक विश्वकर्मा -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी:

सर्जनशील सिने दिग्दर्शक आणि संवेदनशील भाष्यकार महेश भट्ट:

बौद्घिक वारशाला अभिनय-दिग्दर्शनाचे कोंदण लाभलेला सुसंस्कृत चेहरा- मृणाल कुलकर्णी:

वंचितांना प्रकाशवाटा दाखविणारा सामाजिक दीपस्तंभ -ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे:

देशातील टीव्ही जर्नालिझमला नवा आक्रमक चेहरा देणारे अर्णब गोस्वामी:

काँग्रेसमधील मृदुभाषी तरुण तुर्क- माजी खासदार मिलिंद देवरा:

लेखापरीक्षण कौशल्यातून उद्योगांना नवा अर्थ देणारे आयडीएफसीचे एमडी व सीइओ तसेच बीसीसीआयच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य विक्रम लिमये:

तंत्रज्ञानातून शेतीला नवसंजीवनी देणारे युपीएलचे कार्यकारी संचालक विक्रम श्रॉफ:

व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अर्थात आधुनिक संवाददूत - सुनील सूद:

रुग्णांच्या हृदयाची हाक ऐकणारे सर्जनशील किमयागार डॉ. रमाकांत पांडा:

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा:

लोकमताचा कौल आणि ज्युरींची पसंती यातून निवड झालेल्या रत्नांचा गौरव सोहळा लोकमतच्या व्यासपीठावरून होईल. या निवडीत सहभाग देण्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील वाचक आॅनलाइनद्वारे आपला कौल देत आले आहेत. गेल्या वर्षी विविध नामांकनांसाठी लाखोंनी मतदान झाले होते.

यापूर्वी या सोहळ्याचे ज्युरी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रा. शशीकुमार चित्रे, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, उद्योगपती हर्ष गोयंका, प्रख्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम, चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर, हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार तसेच प्रख्यात क्रीडा समीक्षक अय्याज मेमन, माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक व गीतकार गुलजार, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजिका लीला पूनावाला, नामवंत चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, पोलीस अधिकारी जे. एफ. रिबेरो, पत्रकार राजदीप सरदेसाई, शोभा डे अशा मान्यवरांनी काम पाहिले होते.महाराष्ट्राचा अभिमान वाढविणाऱ्यांचा सन्मान करणे, हा या मातीतील प्रत्येकाचा पर्यायाने लोकमताचा अधिकार आहे. म्हणूनच कृतज्ञतेची पोचपावती देण्यासाठी अशी माणसे...महाराष्ट्राचे व्यक्तिस्वरूप मानबिंदू हेरण्यासाठी 'लोकमत'च्या संपादकीय चमूने गेले काही महिने मंथन केले. कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वांचा शोध घेतला. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला 'लोकमत' चांद्यापासून बांद्यापर्यंत अक्षरश: कानाकोपऱ्यात पोहोचलेला असल्यानेच अशी प्रकाशझोतापासून दूर राहिलेली कर्तबगार माणसे या पुरस्काराच्या नामांकनासाठी शोधणे शक्य झाले. हे केवळ 'लोकमत'लाच शक्य आहे, याची जाणीव असलेल्या वाचकांचा या निवड प्रक्रियेतील सहभाग विशेष ठरत आहे. म्ह़णूनच लक्षात ठेवा आणि करा मतदान...तुमचं एक मत, बनू द्या लोकमत!