शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बोलीभाषांचा आदर करा!

By admin | Updated: April 5, 2016 02:21 IST

हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोलीभाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत

प्रज्ञा केळकर-सिंग ,संतश्रेष्ठ नामदेवनगरी (घुमान)हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोलीभाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे नवे दालन खुले झाले आहे, असा आशावाद पहिल्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सरहद संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय बहुभाषिक संमेलनाच्या सांगता सोहळ््यात सोमवारी व्यक्त केला.सुरेखा देवी, साहित्यिक विष्णू सूर्या दास, ज्येष्ठ पत्रकार जतिंदर पन्नू, सरहदचे संजय नहार, भारत देसडला, स्वागताध्यक्ष अरुण नेवासकर, राजन खान आदी मान्यवर उपस्थित होते.‘संत नामदेव महाराज की जय’च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. देवी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व राज्यांमध्ये एकात्मता, सांस्कृतिक, सामाजिक ऐक्य नांदत होते. गेल्या काही वर्षांमध्ये हे ऐक्य लोप पावले आहे. गेल्या वीस वर्षांत आपल्याला स्वातंत्र्याच्या मार्गाचा विसर पडला आहे. स्वातंत्र्य आणि स्वत:मध्ये विसंवादाची मोठी भिंत उभी राहिली आहे. दोन प्रातांमध्ये संवाद, संस्कृतींची ओळखच उरलेली नाही. आपल्याला एकमेकांची साहित्यिक वैशिष्ट्ये माहीत नाहीत, ही मोठी दु:खद बाब आहे. विसंवादाच्या भिंती उभ्या राहिल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या भिंतीमध्ये संवादाची खिडकी दिसू लागली आहे. स्वातंत्र्य पुन्हा एकदा टप्प्यात आलेले असताना ते मिळवण्यासाठी धाडसाने पावले उचलायला हवीत. मानवतेचा आणि भाषिक ऐक्याचा वारसा जपायला हवा. भाषांची सरहद तोडून संस्कृती समृद्ध करायला हव्यात.नि. ना. रेळकर यांच्या ‘संत नामदेव विहंग दर्शन’, सिमरत सुमेरा यांच्या ‘पुखराज’ आणि राजवंद राज यांच्या ‘रागनिया’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.