शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आधी राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जा - धनंजय मुंडे

By admin | Updated: July 30, 2015 17:17 IST

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत व चौकशीला सामोरे जावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३० -  महिला व बालकल्याण खात्यातील २०६ कोटी रुपयांच्या चिक्की व अन्य साहित्य खरेदी प्रक्रियेत सरकारी नियम पायदळी तुडवण्यात आल्याचा घणाघाती आरोप करत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत व चौकशीला सामोरे जावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 
गुरुवारी चिक्की प्रकरणावरुन विधान परिषदेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या खात्यातील अनागोंदी कारभाराचा लेखाजोखाच सभागृहासमोर मांडला. चिक्की खऱेदी प्रक्रियेत घोटाळा  असून सत्तेवर आल्यावर फडणवीस सरकार  असंवेदनशील झाल्याची टीका त्यांनी केली. सुर्यकांता व कंत्राटदारांसोबत झालेल्या दरकराराचे कागदपत्र सरकारने सादर करावे असे आव्हानच त्यांनी सत्ताधा-यांना दिले. 
ज्या कंत्राटदाराचा स्वतःचा उत्पादन प्रकल्प असतो त्यालाच दरकरार दिले जातात याकडे मुंडेंनी लक्ष वेधले. सुर्यकांताने २७ लाख किलो चिक्की बनवली तर त्यांना किती वीज बिल, पाणी बिल आले, त्यांनी गुळ कुठून आणला हेदेखील समोर यायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. ताट खरेदी, वॉटर प्यूरिफायर, चटई याच्या खरेदीतही नियमांचे उल्लंघन झाले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे २० मेरोजी निवेदन दिले होते. मी या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही, मग मुख्यमंत्री कार्यालयातून या कागदपत्रांना पाय कसे फुटले याची चौकशी तुम्ही करवून घ्या असे सांगत त्यांनी भाजपामधील अंतर्गत संघर्षही समोर आणला. चिक्कीचा दर्जा चांगला नसल्याचे समोर आले असले तरी संबंधीत खात्याच्या मंत्री व अधिका-यांनी ही चिक्की चांगली असल्याचे दोन अहवाल मॅनेज करुन घेतले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हवाला घोटाळ्यात नाव येताच राजीना दिला होता, तुम्ही अशा नेत्यांचा वारसा पुढे नेत असाल तर आधी राजीनामे द्या व चौकशीला सामोरे जावे असा टोलाही त्यांनी लगावला.