शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पियरचे काम पावसाळ्यात संपवण्याचा संकल्प

By admin | Updated: March 24, 2017 01:58 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पश्चिम उपनगरात हाती घेण्यात आलेल्या मेट्रो ७ या प्रकल्पातील पायलिंग, पाईल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यात संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पश्चिम उपनगरात हाती घेण्यात आलेल्या मेट्रो ७ या प्रकल्पातील पायलिंग, पाईल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यात संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू असताना वाहतूककोंडी होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो ७ या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा प्रकल्प असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटेल, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो ७ चे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी गुरुवारी तज्ज्ञांसह मेट्रो ७ च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असून, दराडे यांनी या वेळी या प्रकल्पातील पायलिंग, पाईल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यात संपवण्यात येईल, असा संकल्प केला आहे.सध्या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे येथे बॅरिकेड्स लावण्यात आले असून, यामुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. परिणामी या कामाचा मुंबईकरांना कमीत कमी त्रास होईल, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. आणि यावर उपाय म्हणून येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत, असेही दराडे यांनी प्रकल्प भेटीवेळी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)