शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून विरोधकांचा सभात्याग

By admin | Updated: April 12, 2016 03:09 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. उलटपक्षी गतसरकारने मराठा आरक्षणाबाबत जे केले नाही, ते आम्ही करत आहोत, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. उलटपक्षी गतसरकारने मराठा आरक्षणाबाबत जे केले नाही, ते आम्ही करत आहोत, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानपरिषदेत करताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. विशेष म्हणजे, तावडे यांच्या या वक्तव्यावर मराठा आरक्षणाबाबत चालढकल आणि हयगय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी सभात्याग केला.मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यापासून त्यावर न्यायालयात स्थगिती मिळेपर्यंतच्या काळात नोकरी मिळालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले नसल्याचा मुद्दा विनायक मेटे यांनी लक्षवेधीद्वारे मांडला. शिवाय, अशा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत अधिकारी वर्गाकडून चालढकल करण्यात येत असल्याचे म्हणणे मांडले.यावर उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण घोषित झाले असले, तरी न्यायालयात त्यावर स्थगिती आली आहे. दरम्यानच्या काळात नोकरी मिळालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाले नसल्याची वस्तुस्थिती असली, तरी या प्रकरणी न्यायालयात ‘सिव्हील अपील’ दाखल करण्यात आले आहे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर या प्रकरणातील सत्यताही तपासली जाईल.यावर मेटे यांनी सुमारे १७००-१८०० उमेदवारांचा हा प्रश्न असून, त्यामुळे समाजात असंतोष पसरल्याचे आवर्जून नमूद करत मराठा समाजाला न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली, तर दुसरीकडे तावडे यांच्या असमाधानकारक उत्तरावर धनंजय मुंडे आणि विक्रम काळे यांनी घोषणा देत सभात्याग केला. (प्रतिनिधी)दरम्यान, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना वेळीच धडा शिकवत, योग्य वेळी योग्य चौकशी करा, असे निर्देश दिले. शिवाय मराठा आरक्षणप्रकरणात उमेदवारांना न्याय देण्यासाठी मंगळवारी बैठक घ्या किंवा सभागृहात अर्धा तास चर्चा करा, असेही निर्देश दिले.