शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मॅक्सीकॅबला एसटी महामंडळाचा विरोध

By admin | Updated: August 27, 2016 05:12 IST

मॅक्सीकॅबला परवानगी एमएमआरटीएकडून (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) देण्यात आल्यानंतर शासनाकडून त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार

मुंबई : ‘पॉइंट टू पॉइंट’ सेवा सुरू करण्यासाठी मॅक्सीकॅबला परवानगी एमएमआरटीएकडून  (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) देण्यात आल्यानंतर शासनाकडून त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला एसटी महामंडळाचा विरोधच असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीसाठी एसी बेस्ट बस सेवा, ठाणे परिवहन सेवा, नवी मुंबई परिवहन सेवा इत्यादी संस्थांमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवाही अपुरी असून खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सक्षम पर्याय उपलब्ध करण्यात यशस्वी झालेली नाही. त्यामुळे बारा आसनी एसी मॅक्सीकॅब सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला जुलै महिन्यात एमएमआरटीने मंजुरी दिली. मॅक्सीकॅबला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यास एमएमआरटीए क्षेत्रात ती सेवा दिली जाईल. मॅक्सीकॅबला सार्वजनिक परिवहन सेवांच्या युनियनकडून विरोध करण्यात आला आहे. यामध्ये एसटी युनियनचाही समावेश आहे. युनियनकडून भूमिका स्पष्ट करण्यात आल्यानंतर एसटी महामंडळाने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांना विचारले असता, एसटी महामंडळाचा मॅक्सीकॅबला विरोधच आहे; आणि महामंडळाची ही भूमिका आधीपासूनच असल्याचे स्पष्ट केले. आमची यात मक्तेदारी आहे आणि ती आम्ही सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)।च् मॅक्सीकॅबला सार्वजनिक परिवहन सेवांच्या युनियनकडून विरोध करण्यात आला आहे. त्याचा अंतिम निर्णय हा शासनाकडून घेण्यात येणार आहे. मात्र सध्या न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मॅक्सीकॅबचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यासाठी नवीन परवाना वाटप करण्यात आलेले नसल्याची माहिती दिली.