शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: June 10, 2016 03:16 IST

रिअ‍ॅक्टर स्फोटामुळे परिसरातील तीन हजार घरांचे तब्बल सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- एमआयडीसीतील ‘प्रोबेस एंटरप्रायजेस’ या रासायनिक कंपनीतील रिअ‍ॅक्टर स्फोटामुळे परिसरातील तीन हजार घरांचे तब्बल सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पंचनाम्यांमुळे उघडकीस आली आहे. मात्र, मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारतर्फे केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, भरपाई देण्याबाबत त्यांनी काहीच जाहीर केलेले नव्हते. तसेच तपासअधिकारी व मदतकार्य करणाऱ्या पथकांना काहीच सूचितही केलेले नाही. त्यामुळे जरी पंचनामे झाले असले, तरीही मदत मिळेलच, याची शाश्वती नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. स्फोटात जखमी झालेल्या २०८ जणांवर दहाहून अधिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. त्यावर, २६ ते २७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सोमवारपर्यंत पाठवण्यात येणार आहे. तो खर्च संबंधित रुग्णालयांना मिळेल. >सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडणारप्रोबेस कंपनीतील स्फोटात १२ जणांचा बळी गेला. २०८ जणांना दुखापत झाली, त्यातील १४ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. तर, अजूनही दोघे जण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांच्यापुढे मोडलेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, असा यक्षप्रश्न आहे. असे असतानाच नुकसानभरपाईवरही पाणी सोडायचे झाल्यास सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडणार आहे.विद्युत उपकरणेही बादस्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या परिसरातील घरे, दुकाने, शोरुम्स व कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या काचांच्या खिडक्या, दरवाजे तुटले आहेत. तर, काही ठिकाणी भिंतींना तडेही गेले आहेत. अनेकांच्या फ्रीज, टीव्ही यासह अन्य विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कंपन्यांनाही ठेंगाया स्फोटात ६५ कंपन्यांचे किती नुकसान झाले, याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरू आहे. त्या कंपन्यांनी विमा काढला होता का, तसे असल्यास त्यांना किती भरपाई मिळू शकते, याबाबतचीही माहिती घेण्यात येत आहे. मात्र, तीही मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.