शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांसाठी रहिवाशांचे आंदोलन

By admin | Updated: April 27, 2016 03:01 IST

माटुंग्यातील रहिवाशांना मात्र शौचालयासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

मुंबई : देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झालेली असताना माटुंग्यातील रहिवाशांना मात्र शौचालयासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षे शौचालयाची दुरवस्था असताना पालिका आणि स्थानिक नगरसेवक या समस्येकडे कानाडोळा करत असल्याने रहिवाशांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील वाल्मीकी नगरात दीड हजार लोकवस्ती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या परिसरात केवळ एकच सार्वजनिक शौचालय आहे. त्यातच पालिकेने कित्येक वर्षे या शौचालयाची डागडुजी न केल्याने सध्या या शौचालयाची मोठी दुरवस्था आहे. डागडुजीअभावी शौचालय कोसळण्याच्या अवस्थेत आहे. तर शौचालयाची ड्रेनेज लाइन पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने संपूर्ण सांडपाणी परिसरात वाहत असते. तसेच शौचालयाचे दरवाजे आणि खिडक्यादेखील पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. शिवाय या ठिकाणी लाइटचीदेखील सोय नसल्याने रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी या समस्येला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांनी अनेकदा पालिका आणि येथील स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांनी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांविरुद्ध आंदोलन छेडले आहे. सोमवारी या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून पालिका आणि नगरसेवकाचा निषेध व्यक्त केला. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर पालिकेने तत्काळ कारवाई करावी आणि ही समस्या लवकरच सोडवावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)