शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या विकीची आईशी दोन वर्षांनी पुनर्भेट

By admin | Updated: October 2, 2016 05:54 IST

चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली. तोतरा असताना आईला भेटण्याच्या

- पंकज रोडेकर,  ठाणेचैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली. तोतरा असताना आईला भेटण्याच्या प्रबलशक्तीने अखेर त्याची आईशी ठाणे शहर पोलिसांमुळे भेट झाली असून तो लवकरच घरी जाणार आहे. जालना येथील अत्यंत गरीब घरातील विकी उपाते (पोटभरे) हा २०१४ मध्ये मुंबईत आजीसोबत आला होता. याचदरम्यान, दादर चैत्यभूमीवर गेला असताना त्यांची चुकामूक झाली. गर्दीत आजी सापडली नाही, म्हणून तो कसाबसा दादर रेल्वे स्थानकात आला. येथून आपल्या गावी ट्रेन जाईल म्हणून तो लोकलमध्ये बसला. त्याचदरम्यान, त्याला कल्याण स्थानकात पोलिसांनी त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली. तेथे तीन-चार महिने जात नाही, तोच त्याची रवानगी उल्हासनगर बालसुधारगृहात झाली. याचदरम्यान, त्याला आईची खूप आठवण येत असल्याने त्याने तेथून दोन ते तीन महिन्यांतच पळ काढला खरा, पण तो पोलिसांना रेल्वे स्थानकात भटकताना आढळला. त्यांनी त्यास मानखुर्दच्या बालसुधारगृहात जमा केले. येथे एक वर्ष होत असताना वारंवार येणाऱ्या पोलिसांकडे पाहून हेच आपल्या घरी नेतील, असा विश्वास त्याच्या मनात हळूहळू निर्माण होऊ लागला. बदलापुरात हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी ठाण्याचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट गेले असताना विकीने त्यांचे लक्ष वेधले. त्याने आईला भेटायचे आहे, असे सांगितले. त्याने केवळ विकी असे नाव सांगितले. आपले आडनाव सांगण्यासाठी त्याने पोटावरून हात फिरून ते भरलेले आहे, असून सांगून पोटभरे असे सांगितले. तसेच जालन्यात शिकतो, असे सांगितले. या आधारे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांच्या पथकातील ोलीस उपनिरीक्षक पी.एस. राणे, पोलीस हवालदार एम.एच.निकम, बी.बी.शिंगारे, छाया गोसावी आणि प्रमोद पालांडे आणि एन.बी. चव्हाण यांनी इंटरनेटद्वारे जालन्यातील सर्व शाळांशी संपर्क साधून त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यावेळी एका शाळेत असा मुलगा दोन वर्षांपासून आलाच नसल्याचे सांगताना तो त्याच शिक्षकांच्या वर्गात शिकत असल्याचे स्पष्ट झाले.आई हंगामी कामगारगरीब कुटुंबातील विकीला वडील नाहीत. त्याची आई ऊसतोड कामगार आहे. तसेच सहा महिने आई एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कामाला जात असल्याने तो आणि त्याची मोठी भावंडे आजीसोबत जालन्यामध्ये राहतात, असे पोलिसांनी सांगितले.शिक्षकाची धडपड ज्या शाळेत विकी शिकत होता, त्याच शिक्षकांना पोलिसांनी संपर्क साधल्यावर तो मुंबईत असल्याचा निरोप त्याच्या घरी पोहोचवला. तसेच त्याच्या घरी फोन अथवा मोबाइल नसल्याने शिक्षक हेच माध्यम ठरले होते. पोलिसांच्या संपकर् ात ते शिक्षक राहिल्याने तो आता घरी जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.