शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या विकीची आईशी दोन वर्षांनी पुनर्भेट

By admin | Updated: October 3, 2016 02:58 IST

चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली.

पंकज रोडेकर,

ठाणे- चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली. तोतरा असताना आईला भेटण्याच्या प्रबलशक्तीने अखेर त्याची आईशी ठाणे शहर पोलिसांमुळे भेट झाली असून तो लवकरच घरी जाणार आहे. जालना येथील अत्यंत गरीब घरातील विकी उपाते (पोटभरे) हा २०१४ मध्ये मुंबईत आजीसोबत आला होता. याचदरम्यान, दादर चैत्यभूमीवर गेला असताना त्यांची चुकामूक झाली. गर्दीत आजी सापडली नाही, म्हणून तो कसाबसा दादर रेल्वे स्थानकात आला. येथून आपल्या गावी ट्रेन जाईल म्हणून तो लोकलमध्ये बसला. त्याचदरम्यान, त्याला कल्याण स्थानकात पोलिसांनी त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली. तेथे तीन-चार महिने जात नाही, तोच त्याची रवानगी उल्हासनगर बालसुधारगृहात झाली. याचदरम्यान, त्याला आईची खूप आठवण येत असल्याने त्याने तेथून दोन ते तीन महिन्यांतच पळ काढला खरा, पण तो पोलिसांना रेल्वे स्थानकात भटकताना आढळला. त्यांनी त्यास मानखुर्दच्या बालसुधारगृहात जमा केले. येथे एक वर्ष होत असताना वारंवार येणाऱ्या पोलिसांकडे पाहून हेच आपल्या घरी नेतील, असा विश्वास त्याच्या मनात हळूहळू निर्माण होऊ लागला. बदलापुरात हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी ठाण्याचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट गेले असताना विकीने त्यांचे लक्ष वेधले. त्याने आईला भेटायचे आहे, तसेच जालन्यात शिकतो, असे सांगितले. या आधारे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पी.एस. राणे, पोलीस हवालदार एम.एच.निकम, बी.बी.शिंगारे, छाया गोसावी आणि प्रमोद पालांडे आणि एन.बी. चव्हाण यांनी इंटरनेटद्वारे जालन्यातील सर्व शाळांशी संपर्क साधून त्याच्याबद्दल माहिती दिली.आई हंगामी कामगारगरीब कुटुंबातील विकीला वडील नाहीत. त्याची आई ऊसतोड कामगार आहे. तसेच सहा महिने आई एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कामाला जात असल्याने तो आणि त्याची मोठी भावंडे आजीसोबत जालन्यामध्ये राहतात, असे पोलिसांनी सांगितले.>शिक्षकाची धडपड ज्या शाळेत विकी शिकत होता, त्याच शिक्षकांना पोलिसांनी संपर्क साधल्यावर तो मुंबईत असल्याचा निरोप त्याच्या घरी पोहोचवला. तसेच त्याच्या घरी फोन अथवा मोबाइल नसल्याने शिक्षक हेच माध्यम ठरले होते. पोलिसांच्या संपकर् ात ते शिक्षक राहिल्याने तो आता घरी जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.>चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरीमुलाच्या शोधासाठी ठाण्याचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट गेले असताना विकीने त्यांचे लक्ष वेधले. त्याने आईला भेटायचे आहे, असे सांगितले. त्याने केवळ विकी असे नाव सांगितले. आपले आडनाव सांगण्यासाठी त्याने पोटावरून हात फिरून ते भरलेले आहे, असून सांगून पोटभरे असून जालन्यात शिकतो, असे सांगितले. या आधारे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पी.एस. राणे, हवालदार एम.एच.निकम यांनी माहिती घेतली.