शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

निवासी डॉक्टर असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 01:40 IST

जुलै महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस निवासी डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मासबंक केला होता.

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस निवासी डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मासबंक केला होता. मासबंक संपून अवघे १५ दिवस उलटल्यानंतर पुण्याच्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकारानंतर राज्यातील चार हजार निवासी डॉक्टर अजूनही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे १० निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. यामुळेच मध्यवर्ती मार्ड संघटनेने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावावेत, वेगळे सुरक्षा रक्षक द्यावेत अशी मागणी केली होती. पुढील पाच महिन्यांत हे काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पण, एखाद्या डॉक्टरला मारहाण झाल्यास गुन्हा दाखल करताना डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत करावा, अशीही मागणी केली होती. पण, पुण्याच्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर डॉक्टर संरक्षण कायद्याविषयीच्या माहितीची मागणी चक्क पोलिसांकडून करण्यात आली. त्यामुळे या कायद्याविषयी अजूनही अनभिज्ञता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात निवासी डॉक्टर गुन्हा नोंदवायला गेले तेव्हा पोलिसांनी कायद्याची प्रत द्या, असे निवासी डॉक्टरांना सांगितले. पोलिसांना प्रत देऊनही त्यांनी त्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मध्यवर्ती मार्ड संघटना अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.