शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘वायसीएम’ रुग्णालयात राखीव कोट्याची मागणी

By admin | Updated: July 21, 2016 02:10 IST

आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांतून अपघातांमुळे पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना बेड व आयसीयू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.

घोडेगाव : आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांतून अपघातांमुळे पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना बेड व आयसीयू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. यासाठी वशिला अथवा ओळख लागते. म्हणून या तीन तालुक्यांतील रुग्णांसाठी वायसीएममध्ये राखीव कोटा असावा, अशी मागणी महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी केली आहे.अपघात, हृदयविकाराचा झटका, सर्पदंश अथवा इतर अचानक निर्माण होणाऱ्या गंभीर आजारांवर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वायसीएम रुग्णालयात घेऊन जाण्याची चिठ्ठी देतात. या तीन तालुक्यांना जवळचे व सरकारी रुग्णालय वायसीएम हेच आहे. अपघातामुळे भांबावलेले तसेच गोरगरीब व अडाणी लोक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वायसीएममध्ये आणतात. मात्र येथे आल्यावर बेड उपलब्ध नाहीत, आयसीयूमध्ये जागा नाही, अशी कारणे सांगून पुढे ससून रुग्णालयात घेऊन जा अथवा खासगी दवाखान्यात न्या, असे सांगितले जाते. ज्याची ओळख अथवा वशिला स्थानिक आमदार, माजी आमदार, नगरसेवक यांच्याशी असल्यास त्या पेशंटची लगेच दखल घेतली जाते. मात्र गरीब लोक एकतर ससूनला घेऊन जातात अथवा दागदागिने गहाण ठेवून पैशाची व्यवस्था करून जवळच्याच खासगी दवाखान्यात अ‍ॅडमिट करतात. लोकांचा त्रास टाळण्यासाठी आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील पेशंटला वायसीएममध्ये राखीव कोटा असावा. आयसीयू उपलब्ध व्हावा, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. (वार्ताहर)