शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जमिनीचा निर्णय आता बारा वर्षांनंतर!

By admin | Updated: August 12, 2015 04:52 IST

विकास योजना वा प्रादेशिक योजनेमध्ये सार्वजनिक कारणासाठी सरकारने आरक्षित केलेल्या जमिनीबाबत आता १२ वर्षांनंतर सरकार निर्णय देणार आहे. यापूर्वी ही मुदत १० वर्षे होती.

- यदु जोशी,  मुंबईविकास योजना वा प्रादेशिक योजनेमध्ये सार्वजनिक कारणासाठी सरकारने आरक्षित केलेल्या जमिनीबाबत आता १२ वर्षांनंतर सरकार निर्णय देणार आहे. यापूर्वी ही मुदत १० वर्षे होती. एमआरटीपी कायद्यातील दुरुस्तीबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.आजवर आरक्षित जमीन सरकार वा स्थानिक स्वराज्य संस्था संपादित करून मोबदला देईपर्यंत १० वर्षे वाट बघावी लागत असे. या १० वर्षांमध्ये ती जमीन संपादित झाली नाही, तर सरकारकडे अर्ज केल्यास त्यावर एक वर्षाच्या आत निर्णय देणे सरकारला बंधनकारक होते. आता राज्य सरकारने ही प्रतीक्षा १२ वर्षांची केली असून, त्यासाठी एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षित जमिनीचे संपादन होईल की नाही याबाबत १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार (पान ९ वर)विकास योजनेत राजकीय हस्तक्षेप वाढविणारा निर्णय...प्रारूप विकास योजनेवर आलेल्या सूचना, हरकतींवर सुनावणी देण्याचे आणि त्यांचा समावेश विकास योजनेत करण्यासाठी सरकारला शिफारस करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणांना देण्यासाठी एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. आजवर हे अधिकार राज्य सरकारला होते. विकास योजनेत विविध आरक्षणांसह अन्य मुद्द्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था वा प्राधिकरणांमधील राजकीय पदाधिकारी या अधिकाराचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. सरकारने मात्र, स्थानिक संस्थांना हे अधिकार देण्याने संपूर्ण प्रक्रियेतील विलंब टळेल, असे समर्थन केले आहे. त्याऐवजी स्थानिक संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, नगररचना खात्याच्या अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून निर्णय घ्यायला हवा होता.