शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठी आरक्षण मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 03:54 IST

पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठाणे : महाराष्ट्रात जातीचे विषय कालवण्याचा उद्योग सुरू आहे. पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा जातींच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केली. पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी फटकारले. शिवसेनेने आधी आरक्षणप्रश्नी भूमिका जाहीर करायला हवी आणि नंतरच विशेष अधिवेशनाची मागणी करायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सेनेला टोलवले.राज्यातील नव्हे, तर देशातील शिस्तबद्ध मोर्चे असे मराठा मोर्चाचे वर्णन त्यांनी केले. त्याचवेळी त्यांनी जातीच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला. ब्राह्मण मुख्यमंत्री असतानाच यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा का काढावासा वाटला, असा प्रश्न करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरत ते म्हणाले, शरद पवार आता म्हणताहेत आरक्षण द्या. पण त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना आरक्षण देण्यापासून कोणी रोखले होते? या लोकांना समाजाशी देणे-देणे नाही. समाजाचा वापर निवडणुकांसाठी कसा करायचा इतके कळते. आरक्षण देण्यातील अडचणी त्यांना ठावूक आहेत, तरीही ते या मुद्द्यावरून वातावरण तापवत असल्याबद्दल त्यांनी टीकास्त्र सोडले.पाकिस्तानमधील सर्जिकल अ‍ॅटॅकसंदर्भात सर्व पक्ष एकासुरात बोलत असल्याचे कौतुक करून त्यांनी पाक कलाकारांच्या मुद्द्यावरून मित्र असलेल्या सलमान खानला फटकारले. देशासमोर व महाराष्ट्रासमोर कोणी माझा मित्र नाही. त्याने जपून बोलायला हवे होते, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. कलाकाराला सीमेचे बंधन नसल्याचे मत मांडणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. सीमेवरच्या जवानाचे पाकिस्तानशी वैयक्तिक भांडण नाही. तो तेथे लढतो म्हणून आपण येथे सुखात जगतो, याची जाणिव त्यांनी करून दिली. (प्रतिनिधी)>सर्वाधिक परप्रांतीय ठाणे जिल्ह्यातठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. परप्रांतीय आल्याने लोकसंख्या वाढली आणि नगरपालिकांच्या महापालिका झाल्या. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला.