शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आरक्षण

By admin | Updated: May 10, 2015 02:57 IST

केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना सूचना दिल्या असून, मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे दोन टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय एचआरडीने घेतला आहे. एचआरडीने याबाबतच्या सूचना यूजीसीला दिल्या आहेत. यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना या निर्णयाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी यामध्ये लक्ष घालून या निर्णयाचे पालन करावे, असेही यूजीसीने म्हटले आहे.यूजीसीच्या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यायांमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी २ टक्के राखीव जागा ठेवाव्या लागणार आहेत. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राच्या वतीने काढण्यात आले आहे. या परिपत्रकाद्वारे विद्यापीठाने महाविद्यालयांना २ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, महाविद्यालयांनी याची अंमलबजावणी करावी, असेही कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)