शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण धोरणाआड बिल्डरांचे चांगभलं

By admin | Updated: March 7, 2016 03:36 IST

विकास हक्क हस्तांतरणाचे (टीडीआर) धोरण मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांसाठी जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने त्याच वेळी समावेशक आरक्षणाचे धोरण

यदु जोशी , मुंबईविकास हक्क हस्तांतरणाचे (टीडीआर) धोरण मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांसाठी जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने त्याच वेळी समावेशक आरक्षणाचे धोरण (अ‍ॅकोमोडेशन रिझर्व्हेशन पॉलिसी) जाहीर का केले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून, आधी अस्तित्वात असलेल्या नियमांचा आधार घेत, अनेक शहरांमध्ये बिल्डरांचं चांगभलं करण्यामागे काय उद्देश होता, असा सवाल केला जात आहे. राज्य सरकारने टीडीआर आणि अ‍ॅकोमोडेशन पॉलिसीबाबतचा प्रारूप आराखडा गेल्या वर्षी एकत्रितपणे जाहीर करीत, त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या होत्या. एखाद्या जमिनीवर सार्वजनिक आरक्षण असेल, तर तेथे बांधकामाला अनुमती देताना विकासकाने वेगवेगळ्या आरक्षणात २० टक्के ते ३० टक्के बांधकाम हे स्थानिक स्वराज्य संस्था वा शासनाला मोफत करून द्यावे, असा नियम आहे. तथापि, नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्यात ५० टक्के बांधकाम मोफत करून द्यावे लागेल, अशी अट टाकली. हा निर्णय होत नाही, तोवर आधीच्या २० टक्क्यांच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने मंजुरी देऊ नये, असे अपेक्षित होते. तथापि, अनेक शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या नियमानुसार, २० टक्के मोफत बांधकामाची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. उद्या ५० टक्के मोफत बांधकामाची अट लागू झाली, तर आपल्याला नुकसान सहन करावे लागेल, हे लक्षात घेऊन विकासकांनी परवानग्या मिळवून घेतल्या. आता ५० टक्क्यांच्या अटीचा समावेश असलेली अ‍ॅकोमोडेशन पॉलिसी जाहीर करण्याचे टाळत आहे. मात्र, २० टक्क्यांच्या नियमाचा लाभ प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतरही विकासकांना का देण्यात आला, ५० टक्क्यांचा अंतिम निर्णय होईपर्यंत २० टक्क्यांची परवानगी देताच येणार नाही, अशी सक्त भूमिका नगरविकास विभागाकडून महापालिका आणि नगरपालिकांना का कळविण्यात आली नाही, टीडीआरबरोबरच अ‍ॅकोमोडेशन पॉलिसी जाहीर का करण्यात आली नाही, असे प्रश्न यातून निर्माण झाले आहेत. प्रारूप आराखड्यातील नियम/अटी शासानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच लागू होतील, अशी भूमिका प्रारूप आराखड्यातच घेण्यात आली होती. त्याचा फायदा विकासकांनी घेतला. उद्या ५० टक्क्यांचे धोरण जाहीर झाले, तरी त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, या बाबत शंका घेतली जात आहे.