शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शिशिरा, मोंटाना इमारतींतील खोल्यांत पुन्हा सर्च आॅपरेशन

By admin | Updated: February 24, 2015 04:15 IST

चार जणांनी आत्महत्या केलेल्या अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील शिशिरा व मोंटाना इमारतीमध्ये ओशिवरा पोलिसांनी पुन्हा सर्च आॅपरेशन सुरु केले

मुंबई : चार जणांनी आत्महत्या केलेल्या अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील शिशिरा व मोंटाना इमारतीमध्ये ओशिवरा पोलिसांनी पुन्हा सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. आत्महत्येनंतर या चौघांच्या मृतदेहाजवळ जे ध्वनिचित्रण सापडले आहे, ते वारंवार पाहिल्यानंतर हे चारही मयत एखादी स्क्रिप्ट वाचावी, त्याप्रमाणे बोलत असल्याचे भासत आहे. त्यामुळे ती स्क्रि प्ट किंवा पत्रांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. सोमनाथ पाल (२०), त्याची बहिण भारती (२५), आई शिख (४५) आणि तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज पटेल (५५) या चौघांचेही मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना शिशिरा आणि मोंटाना इमारतीच्या खोल्यांमध्ये सापडले. सोबत मृत्युपूर्वी लिहिलेले पत्र आणि मोबाईल ध्वनिचित्रणही सापडली आहे. तपास अधिकाऱ्यांनुसार पोलिसांना या दोन्ही इमारतीच्या खोल्यांमध्ये अशा प्रकारचा मजकूर लिहिलेले पत्र किंवा तत्सम गोष्ट आढळलेली नाही. त्यामुळे हे चौघे नक्की कशामध्ये पाहून हे वाचन करीत आहेत. त्यांनी समोर एखादे पत्र लिहून नंतर त्याचे वाचन मोबाईलसमोर केले आहे का? याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या ठिकाणी लिहिलेली पत्र जर पोलिसांना सापडली, तर त्यावरील हस्ताक्षर नेमके कोणाचे आहे? याचीही चौकशी केली जाईल. याप्रकरणाचा सर्वच बाजूने तपास केला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)