शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जैन आगमांवरील संशोधन दिशादर्शक

By admin | Updated: May 9, 2016 03:44 IST

‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती

मुंबई : ‘भगवती सूत्र’ या प्राचीन ग्रंथासह इतर जैन आगमांमध्ये नमूद केलेल्या विविध तथ्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करून जगापुढे मांडण्याचा जैन आचार्यांनी हाती घेतलेला उपक्रम मानवजातीला दिशादर्शक ठरेल, असे सांगत हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावे, अशी अपेक्षा राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.‘भगवती सूत्र’ या प्राचीन आगमासंदर्भात ‘जैन तत्त्वज्ञान आणि विज्ञान’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत रविवारी दादर येथील योगी हॉलमध्ये झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुनी नम्रमुनी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड, जैन विश्वभारतीचे अशोक कोठारी या मान्यवरांच्या उपस्थितीत भगवती सूत्र या पुरातन ग्रंथाच्या पाचव्या खंडाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्यात आला.विद्यासागर राव म्हणाले, पारंपरिक शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण यांची सांगड घालण्याची गरज आहे. असे केल्यास त्यातून चारित्र्य संपन्न समाज निर्माण होईल. महात्मा गांधींवर अहिंसा, अनेकांत व अपरिग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा मोठा पगडा होता याचा उल्लेख करून गांधीजींनी भगवान महावीरांची शिकवण राजकीय व सामाजिक स्तरावर आचरणात आणली.जैन आगम संशोधन प्रकल्प सुरू केल्याबद्दल राज्यपालांनी दिवंगत आचार्य तुलसी व आचार्य महाप्रज्ञ, सध्याचे आचार्य महाश्रमण तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक मुनी महेंद्रकुमार यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जैन समाजातील युवकांनी हुंडा व व्यसनमुक्ती या अनिष्ट प्रथांविरुद्ध तसेच पर्यावरण संरक्षण यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)