शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी संशोधन

By admin | Updated: September 21, 2014 02:19 IST

औषधनिर्मितीसाठी वापरल्या जात असलेल्या ‘सलई’ (बोस्वेलिया) या दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातील एका प्राध्यापकाने संशोधन सुरू केले आहे.

राहुल शिंदे - पुणो
आशिया खंडातील काही ठरावीक देशांत आढळणा:या आणि जगभरात विविध प्रकारच्या औषधनिर्मितीसाठी वापरल्या जात असलेल्या ‘सलई’ (बोस्वेलिया) या दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातील एका प्राध्यापकाने संशोधन सुरू केले आहे.
पश्चिम घाटातील डोंगरउतारावर सापडणा:या या औषधी वनस्पतीचे जैव अभियांत्रिकीच्या साह्याने उतिसंवर्धन करून तिची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल, या संदर्भातील संशोधन प्रकल्प केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाला सादर करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिरूर येथील चांदमल ताराचंद (सी. टी.) बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील सहायक  प्राध्यापक डॉ. विकास नायकवडी यांना या संशोधनासाठी डीएसटीकडून युवा शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांना बोस्वेलिया या दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनासंदर्भातील संशोधनासाठी युवा शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
 
रुजण्याचे प्रमाण अल्प; लुप्त होण्याची भीती
च्सलई या वनस्पतीच्या डिंकापासून ‘धूप’ तयार केला जातो; परंतु वनस्पतीपासून अधिक प्रमाणावर डिंक मिळावा, म्हणून या वनस्पतीच्या खोडाला जखम केली जाते. 
च्मोठी जखम केल्यास ही वनस्पती नष्ट होते. त्यात जमिनीमध्ये या वनस्पतीच्या बिया रुजण्याचे प्रमाण   कमी आहे. 
च्त्यामुळे ही वनस्पती लोप पावण्याच्या मार्गावर आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन करणो महत्त्वाचे आहे, असे नायकवडी यांनी सांगितले. 
 
जगभरात विविध 
औषधांची निर्मिती 
च्नायकवडी म्हणाले की, सलई ही वनस्पती भारत, पाकिस्तान, येमेन, दक्षिण आफ्रिका व ओमान या देशांत आढळते. परंतु, केवळ डोंगरउतारावरच ही वनस्पती वाढत असल्यामुळे अलीकडच्या काळात दुर्मीळ होत चालली आहे.
च्भारतात बिहार, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यांसह महाराष्ट्रात पश्चिम घाटात खंबाटकी, सज्जनगड आदी ठिकाणी ती आढळते. या वनस्पतीपासून औषधांची निर्मिती केली जाते. 
च्प्रामुख्याने आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतींमध्ये सलईपासून तयार केलेल्या औषधांचा उपयोग संधिवात, मूत्रशयाचे आजार, फुप्फुसाचे विकार आदींसाठी   केला जातो.