शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाचे पाठबळ असलेली शिक्षण व्यवस्था विकसित व्हावी!

By admin | Updated: January 3, 2016 02:37 IST

लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त

पुणे : लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त केले. लोकसंख्या आणि शिक्षण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो, यावर देशाचा विकास अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पहिला ‘श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ राज्यपाल राव यांच्या हस्ते दिल्ली येथील एकल विद्यालय फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग बागडा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून शिक्षणामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यासाठी कौशल्य देणारे आणि संशोधनावर भर देणारी शिक्षणप्रणाली कशी विकसित करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांची सर्वाधिक संख्या देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. २०२०मध्ये भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २९ वर्ष असेल. हे वयचीन आणि अमेरिकेच्या तुलनेत आठ वर्षाने कमी असेल. युवाशक्ती हीच खरी देशाची ताकद असून, युवकांनी विविध कल्पना साकार करून समाजोपयोगी संशोधन करायला हवे. (प्रतिनिधी)राज्यातील काही शाळांमध्ये २ ते ३ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असून, काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे लवकरच याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल