शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतर सरकारी बंगला सोडवेना

By admin | Updated: April 23, 2017 02:35 IST

राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरील बंगला सोडला नाही. शासनाकडून दोन सदनिका मिळविल्या असतानाही, त्यांना

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरील बंगला सोडला नाही. शासनाकडून दोन सदनिका मिळविल्या असतानाही, त्यांना अद्याप सरकारी निवासस्थानाचा मोह सुटत नसल्याने, विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक बंगल्याशिवाय कार्यरत आहेत. स्वाधीन क्षत्रिय मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर, सरकारने २४ तासांमध्ये त्यांची ‘राइट टू सर्विस कमिशनर’ या पदावर नियुक्ती केली. त्याच्या जोरावर त्यांनी मंत्रालयाजवळील इमारतीतच मोठ्या सदनिकेची मागणी शासनाकडे केली आहे. मुख्य सचिवांसाठी असलेला राखीव बंगला त्यांनी सोडलेला नसून, १५ मेपर्यंत बंगल्यात राहण्याची परवानगी घेतली आहे. त्यामुळे नवीन मुख्य सचिव सरकारी बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत. स्वाधीन क्षत्रिय यांनी आपल्या मालमत्तेच्या विवरणपत्रात दोन सदनिकांचा उल्लेख केला आहे. वांद्रे पूर्व येथील साईप्रसाद इमारतीत एक सदनिका असून, त्या बदल्यात ते वर्षाला १२ लाख भाडे घेत आहेत, तर दुसरी सदनिका नवी मुंबईत सिडकोने नेरूळ येथे बांधलेल्या ‘वनश्री’ इमारतीत आहे. त्याचे वर्षाला आठ लाख भाडे मिळत आहे, असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)आरटीआय कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रशासकीय बंगल्यात राहणारे क्षत्रिय सरकारकडून मिळविलेल्या फ्लॅटच्या भाड्यातून वर्षाला २० लाख रुपये मिळवित असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी केला आहे. मुंबई व ठाणे विभागात मालकीचे घर असलेल्या अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान देऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.