शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महेश भट्ट यांच्या पूर्वी २० कलाकारांना विनंती संदेश

By admin | Updated: March 7, 2017 05:08 IST

लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या संदीप साहू (२४) याने बॉलीवूडमधील २० जणांना मदतीसाठी विनंतीचे संदेश पाठविले होते.

मुंबई : चित्रपट निर्माता - दिग्दर्शक महेश भट्ट यांना ठार मारण्याची धमकी देण्यापूर्वी लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या संदीप साहू (२४) याने बॉलीवूडमधील २० जणांना मदतीसाठी विनंतीचे संदेश पाठविले होते. सातत्याने विनंती फेटाळल्याने त्याने धमकीचा मार्ग निवडल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मूळचा लखनऊचा रहिवासी साहू हा व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे निराश झाला होता. अशात त्याने बॉलीवूडमधील वरुण धवन, राजपाल यादव, आयेशा श्रॉफ, सुनील ग्रोवर यांच्यासह २० जणांना विनंतीचे मेसेज दिले होते. ‘मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला तुमच्या मदतीची गरज आहे,’ असे त्यांना सांगितले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने विनंती करून काहीही हाती लागणार नसल्याचे त्याला समजले. म्हणून त्याने धमकीचा मार्ग निवडल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याने हे मेसेज त्याच्याच मोबाइलवरून केले आहेत. तसेच गेल्या वर्षी तो कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून गेला होता. २६ फेब्रुवारी रोजी त्याने महेश भट्ट यांना धमकीचा मेसेज पाठवून ५० लाखांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याचा इशारा दिला. ‘आपल्या विरोधात ७० गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्याने म्हटले होते.