शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विनामोबदला सहकार्याचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: June 29, 2016 00:56 IST

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) या कंपनीने ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी फेटाळून लावला.

पुणे : महापालिकेला वाहतुकीचे प्रश्न सोडविण्याबाबत विनामोबदला सहकार्य करण्याचा इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) या कंपनीने ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी फेटाळून लावला. विनामोबदला सहकार्य करण्याच्या बदल्यात ती कंपनी देणग्या स्वीकारण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव फेटाळल्याचे स्थायी समितीच्या सदस्यांनी सांगितले. स्थायीच्या या निर्णयानंतर आयुक्त तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याचा आरोप स्थायीच्या सदस्यांनी केला.स्थायी समितीच्या बैठकीला मंगळवारी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार उशिरा आले. त्या वेळी आयटीडीपी या कंपनीच्या प्रस्तावाचे सादरीकरण सुरू होते. त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला असता स्थायीच्या सदस्यांनी तो फेटाळून लावला. ही कंपनी विनामोबदला सेवा का देत आहे, अशी विचारणा नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली. त्या वेळी या करारामुळे कंपनीला देणग्या मिळू शकतील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय स्थायी समितीकडून घेण्यात आला. त्यानंतर आयुक्त तडकाफडकी बैठकीतून निघून गेले, असा आरोप स्थायी समितीच्या सदस्यांनी केला आहे.बैठकीतून ते निघून गेल्यानंतर एका सदस्याने फोन केला, त्या वेळी आमचे विषय मंजूर होणार नसतील तर स्थायी समितीमध्ये का बसायचे, अशी विचारणा त्यांनी त्या सदस्याला केल्याची माहिती उजेडात आली आहे. नगरसचिवांनी त्यांना फोनवरून विचारणा केली असता वैयक्तिक काम असल्याने बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या वेळी आयुक्त हे त्यांच्या कार्यालयातच बसून होते, असे स्थायीच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त बैठकीतून निघून गेल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. महापालिका आयुक्तांकडून विशिष्ट कंपनीचे विषय मंजूर करण्याचा आग्रह का धरला जातो, अशी विचारणा स्थायीच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे.>वैयक्तिक कारणासाठी अनुपस्थितशहरामध्ये वाहतुकीचे सर्वंकष धोरण ठरविण्यामध्ये इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन डेव्हलपमेंट या कंपनीकडून मदत करण्यात येत आहे. मात्र दुर्दैवाने स्थायी समितीने त्यांच्यासोबतचा विनामोबदला प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र मी त्या कारणावरून बैठकीबाहेर गेलो नाही तर माझे वैयक्तिक काम असल्याने बाहेर गेलो होतो.- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त