बारामती/माळेगाव : विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून प्रजासत्ताकदिनी दारू विक्रेत्यांनी अंगणवाडी कार्यकर्तीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.पद्मिनी ऊर्फ पद्मा शहाजी गव्हाणे, अमोल शहाजी गव्हाणे आणि शहाजी भगवान गव्हाणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.सोमवारी संबंधित अंगणवाडी कार्यकर्ती ग्रामपंचायतीमधून खाऊ घेऊन अंगणवाडीकडे निघाली होती. त्याच वेळी पद्मा गव्हाणे त्यांच्या दिशेने चालत आली. पद्मा हिने पीडित महिलेच्या डोक्यावर खराटा मारला. तसेच, गव्हाणे हिचा मुलगा अमोल, पती शहाजी हे दोघे घरातून पळत आले. त्यांनी लाथ मारून त्यांना दुचाकीसह खाली पाडले तसेच, त्यांची साडी ओढून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कार्यकर्तीचा प्रजासत्ताकदिनी विनयभंग
By admin | Updated: January 28, 2015 04:49 IST