शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चाची राजकीय नेत्यांना तंबी

By admin | Updated: March 6, 2017 05:42 IST

मराठा क्रांती मूक मोर्चात कोणत्याही पक्षाच्या आमदाराने ढवळाढवळ करू नये

मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चात कोणत्याही पक्षाच्या आमदाराने ढवळाढवळ करू नये, अशी तंबी मराठा क्रांती मूक मोर्चाने सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांना दिली आहे. सोबतच मराठा जातीच्या आमदारांनी मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.कोपर्डी येथील घटनेनंतर अहमदनगरमध्ये ‘रास्ता रोको’ करत, मराठा क्रांती मूक मोर्चाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. कोपर्डी घटनेतील नराधमांना तत्काळ फाशी देण्याच्या मागणीसह, मराठा आरक्षण व इतर गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या या निमित्ताने पुुढे आल्या. सुरुवातीचे १५ ते २० मोर्चे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निघाले. मात्र, त्यानंतर धास्तावलेले मराठा समाजातील राजकीय नेते हळूहळू मोर्चामध्ये दिसू लागले. दरम्यानच्या काळात तर मराठा क्रांती मूक मोर्चा राजकीय नेत्यांनी हायजॅक केल्याच्या चर्चाही समोर आल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नाव आघाडीवर होते. अखेर मोर्चावर राजकीय आरोप होऊ लागल्याने जिल्हानिहाय समन्वयकांनी राज्यस्तरीय समन्वय समिती नेमत, या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.कोणत्याही पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांनी मराठा क्रांती मूक मोर्चाची घोषणा करू नये, असा इशारा समन्वय समितीने दिला आहे, शिवाय सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन समितीने केले आहे. त्यासाठी जिल्हानिहाय समन्वयक व प्रतिनिधी त्या-त्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांना मराठा समाजाच्या मागण्यांची आठवण प्रत्यक्ष भेटून, ई-मेल, निवेदन किंवा फोन करून देणार आहेत. दरम्यान, ६ मार्चचा पुढे ढकललेला मोर्चा नेमका कधी आणि कशा प्रकारे काढायचा? याबाबत संबंधित समितीच अधिकृत घोषणा करेल, असेही समितीमध्ये सदस्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)>...नाहीतर आमदारांनी जात बदलून घ्यावी!मराठा समाजाच्या १४५ आमदारांनी अधिवेशनात मागण्यांबाबत आवाज उठवण्याचे आवाहन समन्वय समितीने केले आहे. वेतन वाढीपासून विविध मागण्यांसाठी राजीनामा देण्याचा इशारा देणाऱ्या संबंधित आमदारांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवावी, नाहीतर मराठा जात बदलून घ्यावी, असा इशाराच समितीने दिला आहे.