शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सिहस्थ पर्वण्यांसाठी प्रशासनाचे फेरनियोजन

By admin | Updated: August 31, 2015 01:19 IST

सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीसाठी केलेली रस्तेबंदी, बॅरिकेडिंगमुळे भाविकांबरोबरच नाशिककरांचेही प्रचंड हाल होऊन स्नानास अपेक्षित गर्दी न झाल्याने सुरक्षेच्या अतिरेकावर चौफेर

नाशिक : सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीसाठी केलेली रस्तेबंदी, बॅरिकेडिंगमुळे भाविकांबरोबरच नाशिककरांचेही प्रचंड हाल होऊन स्नानास अपेक्षित गर्दी न झाल्याने सुरक्षेच्या अतिरेकावर चौफेर टीका झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चिंतन केले. पुढील पर्वण्यांसाठी फेरनियोजन करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.पुढील दोन्ही पर्वण्यांमध्ये भाविकांना कमीत कमी त्रास होईल, असा बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, पहिल्या पर्वणीसाठी भाविकांची गर्दी तशी कमीच असते़ मात्र प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सुमारे २० लाख भाविकांनी गोदाघाटांवर स्नान केले आहे़ सायंकाळी ५ नंतर गर्दी वाढल्यामुळे पोलिसांना पुन्हा बॅरिकेडिंग करावी लागली़ पोलिसांच्या नियोजनामुळेच कोणतीही दुर्घटना घडली नाही़सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांना मोठी पायपीट करावी लागली. पुढील पर्वण्यांमध्ये पायपीट कमी व्हावी, नाशिककरांनाही अतिरक्त बंधन वाटू नये, अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात सर्वच भाविकांची इच्छा रामकुंडामध्ये स्नान करण्याची असते. मात्र बॅरिकेडिंग व पोलीस बंदोबस्त ठेवला नाही व सर्व भाविकांना एकाच वेळी रामकुंडावर सोडले तर दुर्घटना घडण्याची भीती आहे. १३ व १९ सप्टेंबरला पुढील पर्वण्या होणार आहेत. (प्रतिनिधी)