शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भाज्यांची आवक कमी : सरव्यवस्थापकांकडे अहवाल रवाना

By admin | Updated: July 5, 2016 17:16 IST

कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशन व हमाल, माथाडी कामगार संघटनेने सोमवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदनंतर मंगळवारी बाजार समितीचे कामकाज पूर्ववत झाले.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ५ : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशन व हमाल, माथाडी कामगार संघटनेने सोमवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदनंतर मंगळवारी बाजार समितीचे कामकाज पूर्ववत झाले. फळ व भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी सर्व १२५ भाजी व फळ अडतदारांची दुकाने पहाटेच सुरू झाली. सहा वाजेपर्यंत सर्वच दुकाने उघडली. परंतु मंगळवारी भाज्यांची आवक कमी होती. भेंडी, मिरची यांची आवक कमी झाली. वांगी, गिलके, कारले, गोल भेंडी, मेथी यांची आवक मात्र बऱ्यापैकी होती. सर्व भाज्यांचे लिलाव नेहमीप्रमाणे झाले. तर हमाल बांधवही कामावर आले. धान्य बाजारातील कामकाजही पूर्ववत सुरू झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. शासनाने दखल घ्यावीशेतकऱ्यांचे नुकसान करावे, अशी फळ व भाजीपाला असोसिएशनची भूमिका नाही, परंतु अडतदारांचे नुकसान व्हायला नको, अनेक लोकांना बाजार समितीमध्ये रोजगार मिळाला त्यांचाही विचार करावा. आम्ही फक्त एकदिवसीय बंद पुकारला होता. पुढील भूमिका अजून निश्चित झालेली नाही, असे फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशनने म्हटले आहे. अहवाल सरव्यवस्थापकांना पाठविलाबाजार समितीमध्ये सोमवारी पुकारलेल्या बंदचा अहवाल पणन मंडळाच्या सरव्यवस्थापकांनी मागितला होता. तो पाठविल्याची माहिती बाजार समितीचे सचिव एस.पी.पाटील यांनी दिली.