शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’च्या कामाचा अहवाल द्या

By admin | Updated: July 13, 2015 01:08 IST

गुजरातमध्ये उभारण्यात येत असलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ (सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा) या प्रकल्पाचे बांधकाम २० हजार चौरस मीटर किंवा

पुणे : गुजरातमध्ये उभारण्यात येत असलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ (सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा) या प्रकल्पाचे बांधकाम २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे का, याची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल नकाशासह सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत.सप्टेंबर २००६मध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाने जारी केलेल्या पर्यावरण परिणाम विश्लेषण मानकांनुसार कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर त्यानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे. न्यायाधीश विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्ट आणि गुजरात सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ प्रकल्पासाठी पर्यावरण मंत्रालयाची संमती घेतली नसल्याबद्दल न्यायाधिकरणात मार्चमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. गुजरातमधील तृप्ती शहा, गिरीश पटेल, कृष्णकांत चौहान यांच्यासह दहा जणांनी एकत्रित ही याचिका दाखल केली होती. ट्रस्टचे अध्यक्ष, सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे अध्यक्ष, गुजरात सरकारचे मुख्य सचिव, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाचे राज्यस्तरीय विश्लेषण अधिकारी यंत्रणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लॉर्सन अ‍ॅण्ड टुर्ब्रो लिमिटेड (मुंबई) अशा सहा जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. हरित न्यायाधिकरण यांनी आदेशात म्हटले की, शासन प्रमाणित स्थापत्य अभियंता आणि तज्ज्ञांकडून या प्रकल्पाच्या ठिकाणी २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त बांधकाम आहे का, या संदर्भातील अहवाल नकाशासह तयार करून घ्यावा आणि तो न्यायालयासमोर सादर करावा. पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या पर्यावरण परिणाम विश्लेषण मानकांनुसार कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर त्यानुसार निर्णय घेतला जाईल.