शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीचे पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास नोंदवा

By admin | Updated: May 8, 2014 22:41 IST

पुणे शेतीचे नुकसान होऊनही पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास शेतकर्‍यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या तक्रार रजिस्टरमध्ये तक्रार करावी

जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहनपुणे शेतीचे नुकसान होऊनही पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास शेतकर्‍यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या तक्रार रजिस्टरमध्ये तक्रार करावी.या तक्रारींची वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांकरवी चौकशी केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी आज पत्रकारांना सांगितली. मध्यंतरी झालेल्या गारपीटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे विविध तालुक्यांतील शेतकर्‍यांचे शेतीचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.अनेक गावांमधून नुकसान होऊनही पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आहेत.यापार्श्वभुमीवर जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तहसीलदारांना याविषयी पहिल्यापासून सुचना देण्यात आल्या आहेत.गावपातळीवर पंचनामे झाले असतील तर मंडल अधिकारी, नायब तहसीलदार अशा अधिकार्‍यांनी पंचनाम्यांची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये, चावड्यांवर, पंचायत समित्यांमध्ये तसेच तहसील कार्यालयाच्या काचफलकांवर लावण्यात आल्या आहेत.त्यामुळे कोणाचे नुकसान झाले आहे, याची माहिती सर्वांना माहिती होऊ शकते. ज्यांना नुकसानीविषयीच्या तक्रारी आहेत, त्यांनी तक्रार रजिस्टरमध्ये त्या नोंदविणे आवश्यक आहे.दरम्यान, नुकसानग्रस्तांसाठी पहिल्या टप्प्यात १३कोटी४६लाख रूपयांची मदत आली होती.त्यापैकी १८हजार४०१शेतकर्‍यांना खात्यावर १३ कोटी४१लाख रूपयांचे वाटप झाले आहे, असे सांगून जाधव म्हणाले की दुसर्‍या टप्प्यात ४०कोटी१४लाख रूपयांची मदत प्राप्त झाली होती.४८हजार७८शेतकर्‍यांना या निधीचे वाटप केले गेले आहे.तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील १८कोटी२६लाख४८हजार रूपयांचा निधी प्राप्त होणे अपेक्षित असून १३हजार११८शेतकर्‍यांना त्याचे वाटप केले जाणार आहे.