शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By admin | Updated: April 12, 2016 03:08 IST

देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीस जबाबदार असणाऱ्या मुंबई महापालिकेवर ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेत

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीस जबाबदार असणाऱ्या मुंबई महापालिकेवर ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली, तसेच कचरा उचलण्यासाठी मागील १५ वर्षांत देण्यात आलेल्या कंत्राटांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली. सोमवारी विरोधी सदस्यांनी नियम २६० अन्वये देवनार येथील आगीच्या घटना, तसेच डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत प्रस्ताव मांडला होता. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान सर्वच विरोधी सदस्यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या कारभाराचे वाभाडे काढले. चर्चेला सुरुवात करताना राष्ट्रवादी सदस्य किरण पावसकर म्हणाले की, ‘रोज ९ ते १० हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात असल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, केवळ ६ ते ७ हजार मेट्रिक टन कचरा टाकला जातो. त्यामुळे प्रतिटन २५० ते ४०० रुपये प्रमाणे कंत्राटदाराला जास्तीचे ९ लाख मिळतात. हा वरचा पैसा कुठे जातो, याचा शोध घ्यायला हवा. कंत्राटदारांवर कारवाई करण्यास अपयशी ठरलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी पावसकर यांनी या वेळी केली. पालिकेने विविध बँक खात्यात ४० हजाराच्या ठेवी ठेवल्या आहेत. २०१५-१६ या वर्षात डम्पिंग ग्राउंडसाठी ४१७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापैकी केवळ २० टक्के रक्कम खर्च करण्यात आली. देवनार येथील आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला गेला. आयआयटी पवईने दिलेल्या अहवालानुसार, देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याखाली १२७ लाख मेट्रिक टन मिथेन वायू अडकला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण होणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले. या वेळी जनार्दन चांदूरकर, राहुल नार्वेकर, विद्या चव्हाण, जयंत पाटील, प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले आदी सदस्यांनीही आपली मते मांडली. (विशेष प्रतिनिधी)तेव्हा का नाही कारवाई?शिवसेना सदस्या नीलम गोऱ्हे यांनी महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गेली १५ वर्षे राज्यात आघाडी सरकारचे राज्य होते. मग काळात मुख्यमंत्री पदावर असणारे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे काही शिवसैनिक नव्हते. मग त्यांना पालिकेवर कारवाई का करता आली नाही, असा प्रश्न करत विरोधक राजकारण करत असल्याचा दावा केला.