शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हेमा मालिनींविरोधात गुन्हा नोंदवा - संजय निरुपम

By admin | Updated: February 5, 2016 03:55 IST

सरकारी भूखंडाचा विकास करताना पर्यावरण आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

मुंबई : सरकारी भूखंडाचा विकास करताना पर्यावरण आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. गुरुवारी आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलीकडेच भाजपा सरकारने हेमा मालिनी यांना नाममात्र दरात भूखंड दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना निरुपम म्हणाले की, १९९७-१९९८ साली युती सरकारच्या काळात हेमा मालिनी यांना पहिला भूखंड बहाल करण्यात आला होता. या भूखंडाचा विकास करताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा अहवालही सादर केला होता. परंतु युती सरकारने यावर कारवाई केली नाही. उलट त्यांना दुसरा भूखंड बहाल करण्यात आला. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी. १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात हेमा मालिनी निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना दुसरा भूखंड देऊ नये, अशी मागणी निरुपम यांनी केली. विरोधकांची टीका, आंदोलने यांचा कोणताच परिणाम सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर होत नाही. त्यामुळे भूखंडवाटप प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)भाजपाच्या खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नृत्य संस्थेसाठी सरकारने अंधेरी येथील कोट्यवधी रुपयांचा २ हजार चौरस मीटरचा भूखंड अगदी किरकोळ किमतीत दिल्याने वाद निर्माण झाला आहे.हेमा मालिनी व एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.सार्वजनिक मालमत्तेचे वाटप करताना जाहिरात देणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व गरजूंना लिलावात भाग घेता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयाने अनेक निकालांत म्हटले आहे. राज्य सरकारने या आदेशाला केराची टोपली दाखवत व नियम धाब्यावर बसवून अंधेरीतील कोट्यवधी रुपयांचा भूखंड हेमा मालिनी यांना अगदी किरकोळ दरात दिला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.