शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या कलमापन चाचणीचा अहवाल आज

By admin | Updated: April 25, 2016 05:52 IST

सर्व नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल आॅनलाइन पद्धतीने २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर घोषित केला जाणार आहे.

मुंबई : दहावीच्या मार्च २०१६ च्या परीक्षेस प्रथमच बसलेल्या सर्व नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल आॅनलाइन पद्धतीने २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर घोषित केला जाणार आहे. हा अहवाल छापील स्वरूपात विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर वितरित केला जाणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र निवडण्यासाठी मदत मिळावी, यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांचे निकाल दहावीच्या गुणपत्रिकेसोबत देण्याचा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेला प्रकल्प सोमवारी पूर्णत्वास येत आहे. शालेय शिक्षण विभागाने १० नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील इयत्ता १० वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे शासनाने ठरविले होते. ही कलचाचणी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. या कल अहवालात विद्यार्थ्यांचा कल व अभ्यासक्रम अथवा शाखा निवडीविषयी मार्गदर्शन असेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही बाबी यात असतील. विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करून स्वत:स अनुरूप निर्णय घेता येईल. विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी महितीसाठी संकेतस्थळावरून विद्यार्थी व पालकांना माहिती घेता येईल.