शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तपासाचा अहवाल द्या

By admin | Updated: November 18, 2016 07:27 IST

मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आतापर्यंत करण्यात आलेल्या

मुंबई : मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा संपूर्ण अहवाल सादर करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला. यासाठी न्यायालयाने ईडीला तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवर मनी लॉड्रिंग व बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे केला आहे. ईडीने अद्याप काही आरोपींना अटक केली नसल्याचे दमानिया यांचे वकील विजय हिरेमठ यांनी खंडपीठाला सांगितले.‘ईडीने आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा तपशीलवार अहवाल सादर करावा. या केसमध्ये किती आरोपी आहेत, आतापर्यंत कोणाला अटक करण्यात आली आहे अािण कितीजण फरार आहेत, याची संपूर्ण माहिती या अहवालात नमूद करा,’ असे म्हणत खंडपीठाने ईडीला तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)अटकेविरोधात भुजबळांनी दाखल केली याचिकापीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रींग अ‍ॅक्ट) अंतर्गत छगन भुजबळांना अटक करण्यात आली. मात्र ही अटक बेकायदेशीर केल्याचा दावा भुजबळ यांनी याचिकेद्वारे केला आहे. तसेच या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपीला जामीन मिळू शकतो, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. प्रकृती अत्यवस्थ असल्याने जामिनावर सुटका करण्याची मागणीही भुजबळांनी केली आहे.ईडी आपल्या नावाने अन्य व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल दाखवून आपली प्रकृती ठीक असल्याचा दावा न्यायालयांत करत असल्याचा गंभीर आरोपीही भुजबळ यांनी ईडीवर केला आहे. याप्रकरणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने ईडीला २२ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.