शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आंबेडकर भवन’चा अहवाल सादर

By admin | Updated: August 9, 2016 04:14 IST

आंबेडकर भवनाचे व प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी सोमवारी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला.

मुंबई : आंबेडकर भवनाचे व प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी सोमवारी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. उच्च न्यायालयाने अहवाल स्वीकारत, आंबेडकर भवनाची स्थिती १८ आॅगस्टपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश कायम केला, तसेच प्रकाश आंबेडकर यांना तोपर्यंत आंबेडकर भवनात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी ५ आॅगस्ट रोजी आंबेडकर भवन व प्रिंटिंग प्रेसच्या नुकसानीच्या संदर्भातील अहवाल न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे सादर केला. पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आणि प्रकाश आंबेडकर यांनी या अहवालाची प्रत देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. त्यावर उच्च न्यायालयाने आर्किटेक्ट प्रभू यांना दोघांनाही अहवालाची प्रत देण्याचा आदेश दिला आणि याचिकेवरील सुनावणी १८ आॅगस्टपर्यंत तहकूब केली.दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन मोडकळीस आल्यासंदर्भात महापालिकेने पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला १ जुलै रोजी नोटीस बजावली. या नोटिशीची अंमलबजावणी करत, ट्रस्टने २५ जुलै रोजी आंबेडकर भवनाचा काही भाग पाडला. मात्र, डॉ. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी याविरुद्ध आंदोलन केले, तसेच प्रकाश आंबेडकर यांनी ३० जुलै रोजी ‘श्रमदान’ करून, पुन्हा आंबेडकर भवन बांधण्याचे आवाहन समर्थकांना केले. त्यामुळे पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, काही साप्ताहिकांची आणि साहित्यांवरील नियतकालिकांची या प्रिंटिंग प्रेसमधून छपाई होत असे. त्यामुळे आंबेडकर यांनी प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, हे पाहण्यासाठी आंबेडकर भवनात प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळत आंबेडकर भवन व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले, याची तपासणी करण्यासाठी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली, तसेच उच्च न्यायालयाने प्रभू यांना प्रिंटिंग प्रेसमध्ये असलेल्या साहित्याची यादी करून, अहवालात त्या यादीचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)