शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही, प्रदेश काँग्रेसची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:28 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनिती प्रदेश काँग्रेसने ठरविली आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्देशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.

अनंत जाधव सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनिती प्रदेशा काँग्रेसने ठरविली आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्देशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने प्रदेश काँग्रेसने शनिवारी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून राणेंना धक्का दिला आहे. या निर्णयानंतर राणे यांनी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत हे आहेत. मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनीती काँग्रेसच्यावतीने आखली आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टीकेला उत्तर देत नसून त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे. राणेंच्या आरोपांना उत्तर दिले नाही, तर त्यांच्या आरोपातील हवा निघून जाईल तसेच राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, असेही यातून दिसून येईल, अशी यामागची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत.>पक्ष मोठा करणे हे धोरण : अशोक चव्हाणराणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षावर टीका केली तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.>राणे आज सिंधुदुर्गात; कुडाळात मार्गदर्शनजिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर सोमवारी नारायण राणे सिंधुदुर्गात येत असून कुडाळ येथे ते समर्थकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे यावेळी राणे काय बोलणार याकडे जिल्हावासीयांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.