नवी मुंबई : सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची केंद्र सरकारने बीपीटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. पुढील आठवडाभरात राज्य सरकारकडून त्यांच्या बदलीचे आदेश निघण्याची शक्यता असून, त्यानंतर ते आपला नवीन पदभार स्वीकारतील.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना भाटिया यांनी गेल्या तीन वर्षांत अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प त्यांनी मार्गी लावला आहे. दरम्यान, भाटिया यांच्या जागेवर भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
संजय भाटिया यांची बदली
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST