शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

माहीम रस्त्याची डागडुजी होणार

By admin | Updated: May 21, 2016 04:12 IST

पालघर ते माहीम रोड या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.डी. जाधव यांनी दिली

पालघर : पालघर ते माहीम रोड या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.डी. जाधव यांनी दिली. तर या रस्त्याच्या नूतनीकरणाची बारगळलेली निविदा पावसाळ्यानंतर नव्याने पुन्हा विचारार्थ घेतली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी आमदार विलास तरे यांना दिली. या रस्त्याच्या निर्मितीसाठी ५ कोटी ७५ लाखांची निविदा नामंजूर करण्यात आल्यानंतर खड्डे व धुळीने भरलेल्या या रस्त्याच्या उभारणीचे काम ठप्प पडले आहे. या पार्श्वभूमीवर आज बविआचे आमदार विलास तरे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली.या वेळी झालेल्या बैठकीदरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले, माहीमच्या रस्त्याची निविदा नामंजूर करण्यात आली असली तरी पुन्हा आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान नव्याने निविदा काढून रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. मात्र जनतेच्या सोयीसाठी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. डी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पालघर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पालघर रेल्वे स्टेशन ते माहीम रोड या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाच्या ५ कोटी ७५ हजार खर्चाच्या निविदेला सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षानेही बेकायदेशीर काम असल्याचा ठपका ठेवून ती निविदा रद्द करायला भाग पाडली होती. त्यावर मोठेमोठे खड्डे पडल्याने व हा रस्ता धुळीने पूर्ण भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे असल्याने बोईसरचे बविआचे आमदार विलास तरे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील इत्यादींनी मुख्याधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लागल्याने आचारसंहितेच्या कचाट्यात ती सापडून रस्त्याचे काम ठप्प पडले होते. पालघर स्टेशनमधून सर्वात जास्त रहदारीचा म्हणून माहीमचा रस्ता ओळखला जात असून दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात.