शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकामाता विद्यालयास ४ लाख दंड

By admin | Updated: January 20, 2017 04:53 IST

श्री. रेणुकामाता विद्यालयाच्या इमारतीच्या बेकायदा बांधकामास तहसीलदारांनी ४ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़

पाथर्डी (जि. अहमदनगर) : जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टमार्फत मोहटे गावामध्ये चालवण्यात येणाऱ्या श्री. रेणुकामाता विद्यालयाच्या इमारतीच्या बेकायदा बांधकामास तहसीलदारांनी ४ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़मोहटे गावामध्ये जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्टमार्फत रेणुकामाता विद्यालय व वसतिगृह चालविण्यात येते. या विद्यालयाची इमारत गट नं २७२ वर बांधलेली असून, याच इमारतीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी, तसेच बारावीपर्यंत कला व विज्ञान शाखेतील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना नियोजन कलम ५२ व ५३ अन्वये बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे़ हे बेकायदा बांधकाम पाडणे व गट नं २७२ मधील ३०० चौमी क्षेत्रावर विनापरवाना बांधकाम केल्याबद्द तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी हा दंड ठोठावला.दंड न भरल्यास सक्तीने वसुली केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. जगदंबादेवी ट्रस्टकडून रेणुकामाता विद्यालय चालवण्यात येते. ट्रस्टवर असलेले विश्वस्त विद्यालयाचा संपूर्ण कारभार पाहतात़ परंतु विद्यालायाच्या इमारत बांधकामापासून ते आजतागायत बांधकाम परवानाच घेतला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ (प्रतिनिधी)