शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांनी थकविले लाखोंचे भाडे

By admin | Updated: July 11, 2017 01:04 IST

मंडईतील तब्बल ६३५ गाळेधारकांकडे तब्बल १६ लाख रुपयांहून अधिक भाडे थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मंडईतील तब्बल ६३५ गाळेधारकांकडे तब्बल १६ लाख रुपयांहून अधिक भाडे थकबाकी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच ४९ रुपयांच्या भाड्याचा भरणादेखील अनेकांनी केलेला नाही. महापालिकेच्या वतीने महात्मा फुले मंडई परिसरात तब्बल १ हजार २१५ लोकांना गाळ्यांचे वितरण करण्यात अले आहे. यात महात्मा फुले जुनी मंडई, नवीन मंडई, ऊसविभाग, मिनी मार्केट, कमर्शिअल इमारत, मडकेआळी, मसालेवाले डेली पास आणि तंबाखू आळीचा समावेश आहे. यातील ६३५ गाळेधारकांनी वर्षानुवर्षे भाड्याचे पैसेच भरलेले नाहीत. या गाळेधारकांकडून ४९ ते १ हजार ७४० रुपयांचे मासिक भाडे आकारण्यात येते. शहर मध्यवस्तीतील व्यावसायिक दृष्ट्या हा भाग अत्यंत मोक्याचा समजला जातो. या ठिकाणी इतके अल्पभाडे असूनही, बहुतांश गाळेधारकांचा कल भाडे थकविण्यावरच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. जुन्या मंडईतील २७४ गाळेधारकांकडे २१ जून १७ अखेरीस ६ लाख ४ हजार ५२८ आणि नवीन मंडईतील ३१९ गाळेधारकांकडे ७ लाख २९ हजार १७७ रुपयांची थकबाकी होती. ऊस विभागातील १२ गाळेधारकांकडे ४६ हजार २३६, मिनी मार्केटमध्ये दोघांकडे ४०८, मडके आळीतील ११ गाळेधारकांकडे २६ हजार ८५० रुपयांची थकबाकी आहे. मसालेवाले डेली पास दिलेल्या ६ व्यावसायिकांकडे १ लाख ४ हजार २७० आणि तंबाखू आळीतील ११ गाळेधारकांकडे ९५ हजार ९३७ रुपयांची भाडे थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. अशी एकूण ६३५ गाळेधारकांकडे १६ लाख ७ हजार ४०६ रुपयांची रक्कम भाड्यापोटी थकीत असल्याचे माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी उघड केले आहे. मंडईला ‘बाहेरच्यां’चा विळखागाळेधारकांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही व्यवसाय करण्यास परवानगी नसतानाही, अनेक व्यवसायिक रस्त्याच्या कडेला, फुटपाथ अथवा गाळ्याबाहेर दुकान थाटत असतात. अशा व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतरही या बाहेरच्यांचा त्रास काही कमी झालेला नाही. पालिकेने २०१४ साली ६५, २०१३मध्ये १२०, २०१४ मध्ये ८२, २०१५ मध्ये ६७, २०१६ मध्ये ४० आणि २०१७ मध्ये आत्तापर्यंत २५ वेळा कारवाई केली आहे.