शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरारावरील भूखंडांचे नूतनीकरण

By admin | Updated: June 7, 2017 05:20 IST

खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांसाठी पालिकेने नवे धोरण तयार केले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांसाठी पालिकेने नवे धोरण तयार केले आहे. त्यानुसार या भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण केले जाईल. मात्र या धोरणातून महालक्ष्मी रेसकोर्स व वेलिंग्टन क्लबसारख्या मोठ्या भूखंडांना वगळले आहे. शिवसेनेचे महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बनविण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे हे धोरण शिवसेनेने पालिका महासभेत फेटाळले होते. त्यानुसार यात सुधारणा करीत प्रशासनाने नवीन प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर आणला आहे.सन १९३३ मध्ये मुंबई शहर विश्वस्त मुंबई पालिकेत विलीन झाले. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीतील चार हजार १७७ भूखंडांची मालकी पालिकेकडे आली. हे सर्वच भूखंड दहा ते ९९ वर्षे व कायमस्वरूपी भाडेकरारावर देण्यात आले आहेत. यापैकी २३७ भूखंडांचे भाडेकरार संपले आहे. भाडेकरारावरील भूखंडांच्या नूतनीकरणासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाच्यावतीने धोरण निश्चित करण्यात आले आहे.या नियमावलीला भाजपाचे अध्यक्ष असलेल्या सुधार समितीनेही हिरवा कंदील दाखवून शिवसेनेची गोची केली. मात्र या धोरणामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची देखभाल करणाऱ्या मे. वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब या संस्थेलाही नूतनीकरणाची संधी मिळेल. याचा फटका शिवसेनेच्या थीम पार्कच्या प्रस्तावाला बसेल. भाजपाचा हा डाव ओळखून शिवसेनेने महासभेत हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता. सुधारित प्रस्तावानुसार मोठ्या भूखंडांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.>अनेक मालमत्ता मोडकळीसभाडेकरार संपुष्टात आलेल्या भूभागावरील अनेक इमारती उपकरप्राप्त असून त्या मोडकळीस आल्या आहेत. अशा मालमत्तांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. असे २४२ भूखंड आहेत, त्यांचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. त्यांचे नुतनीकरण केल्यास भुईभाड्याद्वारे महापालिकेला महसूल प्राप्त होईल. तसेच ज्यांनी अटीभंग केला आहे, त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. तीन वर्षांत त्यांनी अटी आणि शर्तींचे पालन केल्यास ते भूखंड पालिकेच्या ताब्यात जातील. तसेच रखडलेला पुनर्विकासही मार्गी लागेल आणि भाडेकरूंचे नवीन इमारतीत पुनर्वसन शक्य होईल.